पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय पर्जन्यमान वृत्त (23.08.2020)

0
3011

पालघर, दि. 23 ऑगस्ट:- जिल्ह्यात काल (22 ऑगस्ट) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 192 सेमी पावसाची नोंद झाली असून हा पाऊस 22 ऑगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरीच्या 107% इतका आहे. जिल्ह्यात जून व जुलै महिन्यामध्ये सरासरी 132 सेमी पाऊस पडतो. चालू वर्षी ह्या कालावधीत अवघा 87 सेमी (66%) पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये सरासरी 48 सेमी पाऊस पडतो. त्या तुलनेत चालू वर्षी 22 ऑगस्ट पर्यंत 106 सेमी (222%) पाऊस पडला आहे. ऑगस्ट महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे पावसाने जून – जुलैची कसर भरुन काढत सरासरी पूर्ण केली आहे.

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर ह्या कालावधीत सरासरी एकूण 242 सेमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आतापर्यंत 80% पाऊस पडलेला आहे. पालघर जिल्ह्यातील तालुकानिहाय पडलेला एकूण पाऊस पुढीलप्रमाणे आहे. कंसात 22 ऑगस्टपर्यंत पडणाऱ्या सरासरी पर्जन्यमानाच्या तुलनेत टक्केवारी दिली आहे. दुसऱ्या कंसात संपूर्ण पावसाळ्याच्या तुलनेत पडणाऱ्या एकूण पावसाच्या तुलनेत आतापर्यंत पडलेल्या पावसाची टक्केवारी दिली आहे.
 • वसई तालुका 113 सेमी (104%)(79%)
 • वाडा तालुका 181 सेमी (99%)(69%)
 • डहाणू तालुका 178 सेमी (120%)(94%)
 • पालघर तालुका 227 सेमी (123%)(93%)
 • जव्हार तालुका 180 सेमी (85%)(66%)
 • मोखाडा तालुका 135 सेमी (79%)(60%)
 • तलासरी तालुका 166 सेमी (99%)(78%)
 • विक्रमगड तालुका 184 सेमी (92%)(72%)

पालघर जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा 100% च्या जवळ!
पालघर जिल्ह्यातील धामणी (सूर्या प्रकल्प) धरण (279 दशलक्ष घनमीटर) 98% भरले असून कवडास उन्नैयी (सुर्या प्रकल्प) बंधारा (13.7 दशलक्ष घनमीटर) 100% भरला आहे. पालघर तालुक्यातील वांद्री मध्यम प्रकल्पात देखील (37.11 दशलक्ष घनमीटर) 100% पाणीसाठा भरला आहे. तलासरी तालुक्यातील कुर्झे धरण मात्र (77.9 दशलक्ष घनमीटर) 90.7 इतकेच भरले आहे.
पालघर तालुक्यातील मनोर, माहिम केळवा, शिरगाव, डहाणू तालुक्यातील रायतळे, विक्रमगड तालुक्यातील खांड व मोहखूर्द, जव्हार तालुक्यातील डोमिहिरा व मोखाडा तालुक्यातील वाघ ह्या सर्व लघु पाटबंधारे योजनांमध्ये (एकूण 24.79 दशलक्ष घनमीटर) 100% पाणीसाठा झाला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments