बोईसर स्फोट: 1 बळी, 4 जखमी

0
1881

बोईसर, दि. 17: तारापूर औद्योगिक वसाहतीतील प्लॉट क्रमांक टी -141 वरील नंडोलिया ऑर्गानिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये आज सायंकाळी 7.30 वाजता झालेल्या स्फोटामध्ये संदीप कुशवाहा जागीच ठार झाला असून 1) मोहम्मद मोहसीन अल्ताफ (30) 2) दिलीप गुप्ता (28) 3) उमेश कुशवाहा (22) 4) प्रमोदकुमार मिश्रा (35) हे चार जण जखमी जखमी झाले आहेत. जखमींवर तृंगा (बोईसर) हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. मयत व जखमी हे संबंधित कारखान्याचे कामगार आहेत किंवा परिसरातील वाटसरू आहेत ते कळू शकलेले नाही.

डाय क्लोरो बेंजामाईड एजॉल ह्या रासायनिक उत्पादनाचे काम चालू असताना मिश्रणामध्ये पाणी जास्त झाल्याने डाय क्लोरो डिस्टीलेशन चालू असताना रिॲक्टरचा दाब वाढून हा स्फोट झाल्याची माहिती कंपनीतील ऑपरेटर संदीपकुमार सिंग याने पोलिसांना दिली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने त्वरित मदतकार्य केले असून, पालघरचे अपर पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, बोईसरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वास वळवी, तहसीलदार सुनिल शिंदे, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी मनीष होळकर यांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली आहे.

Shubham Dental Care
Print Friendly, PDF & Email

comments