10 आणि 11 ऑगस्टला पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा

0
1773

बोईसर : गेल्या 4 व 5 ऑगस्ट रोजी हाहाकार माजवणार्‍या पावसाने मागील दोन-तीन दिवसांपासुन काहीशी विश्रांती घेतली असतानाच येत्या 10 व 11 ऑगस्ट रोजी राज्यातील काही भागात वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. यात मुंबई, ठाणे व पालघर जिल्ह्यासह उत्तर कोकणाचा समावेश  आहे.   

गेल्या दोन महिन्यांपासुन किरकोळ बरसलेल्या पावसाने या आठवड्यात राज्यातील विविध भागात जोरदार हजेरी लावत जनजीवन अस्ताव्यस्त करून टाकले होते. पालघर जिल्ह्याला देखील या पावसाचा मोठा तडाखा बसला आहे. 4 व 5 ऑगस्ट रोजी वादळी वार्‍यासह कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नागरी वस्त्यांमध्ये कमरेइतके पाणी साचून मोठे नुकसान झाले आहे.

आता 10 व 11 ऑगस्ट रोजी मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडणार आहे. त्याचप्रमाणे उत्तर कोकणामध्ये देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. बंगालच्या उपसागराच्या तुलनेमध्ये अरबी समुद्रात हवेच्या दाबाचा मोठा पट्टा निर्माण झाला असून अरबी समुद्र किनारपट्टी जवळील प्रदेशात मान्सून मोठ्या प्रमाणात सक्रिय झाला आहे. त्यामुळे सोमवारनंतर मुंबईसहित अनेक भागांमध्ये पावसाचा जोर वाढणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments