कोरोना : पालघर तालुक्यातील आकडा वाढतोय, आज 75 रुग्ण पॉझिटिव्ह; एकट्या बोईसर मध्ये 42 रुग्ण

0
2753

बोईसर, दि. 28 : पालघर तालुक्यातील कोरोना रुग्णांचा आकडा रोजच वाढताना दिसत असून आज पुन्हा तालुक्यात नव्या 75 रुग्णांची भर पडली आहे. तर बोईसरमध्ये रुग्णसंख्या अधिकच वेगाने वाढत असून आज येथे तब्बल 42 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

पालघर जिल्हा माहिती कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, आज, 28 जुलै रोजी जिल्ह्यात (ग्रामीण) एकूण 114 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निष्पन्न झाले आहेत. यात निम्म्याहून अधिक रुग्ण पालघर तालुक्यातील (75) आहेत. तर त्याखालोखाल वाड्यात 26 रुग्ण, डहाणूत 8, विक्रमगडमध्ये 3, तलासरीत 1 व जव्हारमध्ये 1 रुग्ण आढळून आला आहे.

बोईसरमध्ये सर्वाधिक 42 रुग्ण!
पालघर ग्रामीणमध्ये मोठा कोरोना हॉटस्पॉट म्हणून पुढे आलेल्या बोईसरमध्ये आज तब्बल 42 रुग्ण आढळून आले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments