डहाणू तालुक्यात आज नव्या 46 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची भर पडली आहे. त्यामध्ये डहाणू नगरपालिका क्षेत्रातील 13 जणांचा समावेश आहे. तालुक्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 416 झाली असून त्यातील 196 जण पूर्णपणे बरे झाले आहेत व 216 जणांवर उपचार चालू आहेत. तालुक्यातील मृत्यूंची संख्या आज 2 ने वाढून 4 झाली आहे.
आजच्या 46 नव्या रुग्णांपैकी 13 जण डहाणू शहरातील (मल्याण 6, इराणी रोड 2, केटीनगर, मसोली, आंबेडकर नगर, लोणीपाडा, सरावली प्रत्येकी 1) आहेत. बोर्डी 8, चिंचणी 6, वाणगांव 5, तणाशी 5, कलोली 2, घोलवड, वासगाव, नरपड, सावटा, चारोटी, कासा, गांगणगाव प्रत्येकी 1 अशी तालुक्यातील अन्य आकडेवारी आहे.
- तुम्ही Youtube वर News Channel किंवा News Portal चालवता का? मग तुमच्यासाठी अतिशय महत्वाची बातमी आहे!
- केळवे समुद्रात चार मुलांचा बुडून मृत्यू!
- मुजोर विराज उद्योजका विरोधात कामगार आक्रमक
- घिवलीच्या पुनर्वसनाची मागणी
- महिलेला दोन लाखाचे सोन्याचे दागिने रेल्वे पोलिसांनी केले परत
