डहाणू तालुका कोरोना अहवाल: शहरात 91 +Ve व त्यातील 2 जणांचा मृत्यू ; चिंचणी मध्ये 52 व आशागड मध्ये 29 +Ve

0
6716

दि. 22 जुलै:डहाणू तालुक्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 331 झाली असून त्यातील 91 कोरोना बाधीत एकट्या डहाणू शहरातील तर 240 ग्रामीण भागातील आहेत. सध्या 167 जणांवर उपचार सुरु असूनत्यातील 57 जण डहाणू शहरातील आहेत. 162 जण पूर्णपणे बरे झाले आहेत. दोन जणांचा मृत्यू झाला असून दोघेही डहाणू शहरातील आहेत. तालुक्यात 47 प्रतिबंधीत क्षेत्रेजाहीर करण्यात आली आहेत. त्यातील 20 प्रतिबंधीत क्षेत्रे एकट्या डहाणू शहरातील आहेत.
डहाणू शहरातील डहाणू गांव क्षेत्रात सर्वाधिक 19 कोरोना रुग्ण आढळले असून पटेलपाडा येथे 17, मल्याण 15, मसोलीत 15 रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागातील चिंचणी येथे सर्वाधिक 52 व त्या खालोखाल आशागड येथे 29 कोरोना रुग्ण आढळले आहेत. घोलवड येथे 25 व बोर्डीत 20, नरपड 17, कासा 15 अशी कोरोनाग्रस्तांची आकडेवारी आहे.

Print Friendly, PDF & Email

comments