आज पालघर जिल्हाधिकाऱ्यांची पत्रकार परिषद – मराठी पत्रकार परिषदेने केली होती मागणी!

0
3263

कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी लॉक डाऊन व जमावबंदीचा आदेश बजावल्यानंतर 4 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी आज (21 जुलै) पत्रकार परिषदेचे आयोजन केले आहे. पालघर जिल्हा मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हा अध्यक्ष निरज राऊत यांनी काल ही मागणी केल्यानंतर शिंदे यांनी लगेचच सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काल रात्रीच जिल्हा माहिती कार्यालयातर्फे पत्रकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सींगच्या अडचणीमुळे पत्रकार परिषदा होत नसल्या तरी राजकीय नेत्यांचे अनावश्यक दौरे व पत्रकार परिषदांचे मात्र आयोजन होत राहिले. त्यातून प्रशासनाचा पत्रकारांशी संवाद संकुचित झाला होता. हा संवाद पुनर्स्थापित व्हावा ह्यासाठी मराठी पत्रकार परिषदेकडून पत्रकार परिषदेची मागणी करण्यात आली होती. जिल्ह्यातील क्वारन्टाईन केंद्र, कोरोना उपचारासाठी स्थापन केलेली विशेष उपचार केंद्रांची सुसज्जता व गैरसोयी आणि लोकांच्या समस्या निवारणासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजना हे पत्रकार परिषदेतील प्रमुख मुद्दे असणार आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments