डहाणू शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू! नगरपरिषद सदस्य व माजी नगराध्यक्ष पॉझिटीव्ह! आणखी 2 डॉक्टर पॉझिटीव्ह!

0
32890

डहाणू नगरपरिषद क्षेत्रात कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून आज (20 जुलै) कोरानामुळे एका 85 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती ताप आल्यामुळे डहाणू उपजिल्हा रुग्णालयात स्वतःहून दाखल झाली होती. तेथे तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर त्यांना विक्रमगड येथील रिव्हेरा कोव्हीड सेंटरमध्ये हलविण्यात आले. आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला आहे. डहाणू तालुक्यातील हा पहिला कोरोना मृत्यू ठरला आहे.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता / किंवा Ideal Traders, डहाणूरोड-प येथूनही Payment करु शकता)

एका दिवसात डहाणू तालुक्यातून 38 जणांचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून त्यातील 14 जण डहाणू नगरपालिका क्षेत्रातील आहेत. शहरातील आणखी 2 डॉक्टरांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून एक डॉक्टर वापी येथील रुग्णालयात सेवा देत होता. व दुसरा डॉक्टर डहाणू थर्मल पॉवर स्टेशनमध्ये कार्यरत होता.

शहरातील बाधीतांमध्ये एक नगरपरिषद सदस्याचा समावेश असून, ह्या सदस्याचे संपूर्ण कुटूंब पॉझिटीव्ह निघाले आहे. डहाणू नगरपरिषदेच्या एका माजी नगराध्यक्षाचा देखील तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे 7 कर्मचारी पॉझिटीव्ह निघाले आहेत. त्यातील 4 कर्मचारी शहरात रहात असून 3 कर्मचारी बाहेरून ये-जा करीत होते. या आधीच एका सफाई कर्मचाऱ्याला व त्यानंतर सफाई कामगार पुरविणाऱ्या एका कंत्राटदाराला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते.

डहाणू शहरातील कोरोना बाधीतांचा आकडा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर डहाणू नगरपरिषदेने 19 जुलै पर्यंत सर्व नगरसेवकांची तपासणी करण्याचा कार्यक्रम आखला होता. मात्र अनेक सदस्यांनी तपासणी करण्यास टाळाटाळ केल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत केवळ 5 दक्ष सदस्यांनी स्वतःसह कुटूंबियांची तपासणी करुन घेतली आहे.

दरम्यान डहाणू नगरपरिषदेचे आरोग्य समितीचे सभापती भाविक सोरठी यांनी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे शहरात कोरोना प्रसाराची साखळी खंडीत करण्यासाठी 7 दिवसांचा लॉक डाऊन जाहीर करावा अशी मागणी केली आहे. ह्यापूर्वी डहाणू नगरपरिषदेने 15 ते 22 जुलै दरम्यान लॉक डाऊनचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवला होता. मात्र ह्या प्रस्तावास जिल्हाधिकारी यांनी प्रतिसाद दिला नव्हता.

Print Friendly, PDF & Email

comments