वेदांतामधून एक कोरोनाग्रस्त रुग्ण पळाला, गुन्हा दाखल!

0
3496
Vedaanta Hospital

दि. 17 जुलै: डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी येथील वेदांता हॉस्पिटलमध्ये एक रुग्ण दाखल होता. त्याच्या घशाचे नमुने तपासणीसाठी पाठवले असता अहवाल पॉझिटीव्ह आला. हा रुग्ण वेदांतामध्ये उपचार न घेता तेथून पळून गेल्याचे निष्पन्न झाले आहे. ह्या प्रकरणी वेदांतच्या वैद्यकीय अधिकाऱ्याने कासा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा (क्र. 121/2020) दाखल केला आहे. त्याच्या पळून जाण्याचे कारण स्पष्ट झालेले नाही.

Print Friendly, PDF & Email

comments