डहाणू दि. 13 जुलै: डहाणू शहरात आज एका दिवासांत 6 कोरोनाबाधीत निष्पन्न झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यानंतर नगरपालिका प्रशासनाने सहाय्यक जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे 5 ते 6 दिवसांसाठी डहाणू शहरावर निर्बंध टाकण्याचा प्रस्ताव सादर केल्याचे खात्रीलायक सुत्रांकडून समजते आहे. तथापी अजून ह्या प्रस्तावावर उद्या सर्व बाजूनी विचार करण्यासाठी कटियार यांच्या कार्यालयात बैठक होणार असून त्यानंतरच निर्णय होणार आहे. शिक्कामोर्तब झाल्यास नगरपालिकेकडून तशी रीतसर घोषणा केली जाईल. तुर्तास अशी कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नसल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.