बोईसर : भीमनगरमधील 16 जण कोरोना पॉझिटिव्ह

एकाच कुटूंबातील 15 जणांचा समावेश

0
6001

बोईसर, दि. 10 : शहरातील भीमनगर भागातील 14 जणांचे कोव्हिड-19 (कोरोना) चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याच भागात यापुर्वी आढळलेल्या 2 कोरोना रुग्णांच्या संपर्कात हे रुग्ण आल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आज, शुक्रवारी त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

भीमनगरमधील लोखंडेचाळ भागात हे सर्व रुग्ण आढळून आले आहेत. 4 दिवसांपुर्वी या भागातील खाजगी रुग्णालयात काम करणार्‍या 2 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे सदर रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 14 जणांना कॉरन्टाईन करुन त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. आज त्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असुन या एकाच चाळीतील कोरोना रुग्णांची संख्या 16 वर पोहोचली आहे. तर भीमनगरमधील एकुण रुग्णांचा आकडा 20 वर पोहाचला आहे.

  • एकाच कुटूंबातील 15 जणांचा समावेश
    लोखंडेचाळ भागात आढळलेल्या एकुण 16 रुग्णांपैकी 15 रुग्ण केवळ एका कुटूंबातील असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, हे रुग्ण आढळल्यानंतर भीमनगर परिसर कन्टेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
Print Friendly, PDF & Email

comments