पालघर जिल्ह्यातील खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्या! कोरोना उपचार व विलगीकरण केंद्रावर द्यावी लागणार सेवा!

0
1767

RAJTANTRA MEDIA दि. 19 जून: कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांना वेळेवर उपचार देणेकामी जिल्ह्यातील 82 खासगी डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. ह्या यादीमध्ये 5 भूलतज्ञ, 4 एम. डी. मेडिसिन, 10 एम.बी.बी.एस. यांसह बी.ए.एम.एस. व बी.एच.एम.एस. अशा सर्व डॉक्टरांचा समावेश आहे. पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी 17 जून रोजी आदेश काढले असून प्रत्येक डॉक्टरला नेमलेल्या ठिकाणी 15 दिवस सेवा द्यावी लागणार आहे.

सेवा अधिग्रहित करण्यात आलेल्या सर्व डॉक्टरांची निवास, भोजन व भत्त्यांची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हा शल्य चिकित्सक यांना देण्यात आले आहेत. डॉक्टरांनी टाळाटाळ केल्यास अथवा विरोध केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 51(ब), भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता 1860 च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (आपण IDEAL Traders, Dahanu यांचे मार्फतही पैसे अदा करु शकता!)

Print Friendly, PDF & Email

comments