पालघर जिल्हा: आज 5 मृत्यू / वाड्यातील पहिला मृत्यू / एकूण मृत्यू 81 / नवे 20 +Ve

0
2033

पालघर, दि. 18 जून (दैनिक राजतंत्र): पालघर जिल्ह्यात आजच्या दिवसांत कोरोना मुळे 5 मृत्यू झाले असून त्यातील 4 वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील असून वाडा तालुक्यात पहिला मृत्यू उद्भवला आहे. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या आता 81 झाली आहे.

आज जिल्ह्यात 20 नवे कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले असून त्यामध्ये जव्हार 6 (जव्हार शहर 4 व जांभूळ विहीर 2), वाडा 6 (वाडा नगरपंचायत 5 व चाम्बळे 1), डहाणूत 5 (डहाणू शहर 3, थर्मल पॉवर स्टेशन 1, वाणगांव- विक्रमनगर 1), पालघर 2 (बोईसर बीएआरसी 1, शिगांव 1) व विक्रमगड तालुक्यातील 1 (झडपोली) कोरोना बाधीताचा समावेश आहे.

Print Friendly, PDF & Email

comments