डहाणू: कोरोना वॉरिअरचे 11 कुटूंबीय +Ve

0
1461

दि. 15 जून (RAJTANTRA Media): डहाणूतील नरपड येथील एका परिचारिकेच्या कुटूंबातील 11 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. ही परिचारिका वसई विरार महानगर क्षेत्रातील रुग्णालयाच्या सेवेत कार्यरत आहे. तीचा 12 जून रोजी तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर निकटच्या संपर्कातील 20 जणांना क्वारन्टाईन करुन घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असता, 11 कुटूंबीयांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यामध्ये 4 स्त्रीया व 7 पुरुषांचा समावेश आहे. डहाणू तालुक्यातील कोरोना +Ve व्यक्तींची संख्या आता 55 झाली असून, त्यातील 20 जण बरे झाले आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments