3 आरोपींमुळे 28 पोलीस व अन्य 33 जणांची कोरोना चाचणी

0
2064

दि. 5 जून : डहाणू तालुक्यातील 28 पोलीसांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले असून त्यातील 17 जण डहाणू पोलीस स्टेशनच्या नेमणूकीतील आहेत, तर 11 जण कासा पोलीस स्टेशनच्या नेमणूकीतील आहेत.
डहाणू पोलीसांनी अटक केलेल्या 2 आरोपींचा अटकपूर्व चाचणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्यामुळे त्यांच्या संपर्कातील 17 पोलीसांच्या व आरोपीच्या संपर्कातील 21 जणांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. त्यातील 6 पोलीसांचे अहवाल पॉझिटीव्ह व 4 पोलीसांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. 7 पोलीसांचे अहवाल येणे बाकी असून अन्य 21 जणांचे अहवाल देखील येणे बाकी आहे.
कासा पोलीस स्टेशनमध्ये अटकेत असलेल्या एका आरोपीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळल्यामुळे त्याच्या सोबतच्या 12 कैद्यांचे व 11 पोलीसांचे घशाचे नमुने घेण्यात आले आहेत. त्यांचे तपासणी अहवाल येणे बाकी आहे.

Print Friendly, PDF & Email

comments