डहाणू शहराची चिंता वाढली! 1 महिला पोलीसासह 6 पोलीस +Ve

0
777

दि. 2: डहाणू शहरासाठी चिंताजनक बातमी हाती आली असून डहाणू पोलीस स्टेशनच्या नेमणूकीतील 6 पोलीसांचा कोरोना चाचणी अहवाल +Ve आला आहे. हे सर्व जण डहाणू शहरातील एका आत्महत्या प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपींच्या संपर्कात आले होते. पुन्हा ह्या 6 जणांशी निकटचा संपर्क आलेल्या व्यक्तींची तपासणी करणे व कोरोना प्रसाराला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.

कोण आहेत हे आरोपी: डहाणू शहरातील पूर्व भागात एका व्यक्तीने आत्महत्या केली होती. पत्नीचे अनैतिक संबंध व छळ यातून ही आत्महत्या झाल्याचा आरोप असून मयताची पत्नी व तीचा कथीत प्रियकर यांना अटक करण्यात आलेली आहे. कोरोना पॉझिटीव्ह अहवाल आलेल्या पोलीसांपैकी 4 जण डहाणू शहरातील (पटेलपाडा, मांगेल आळी, आंबेडकर नगर, मसोली), 1 जण धुंदलवाडी व एक जण पालघर शहरातील (लोकमान्य नगर) निवासी आहे.

Print Friendly, PDF & Email

comments