पालघर: चक्रीवादळाच्या शक्यतेने 3 जून रोजी कारखाने / दुकाने बंद

0
6572

दि. 2: पालघर जिल्ह्यातील किनारपट्टीवर 3 जून रोजी चक्रीवादळाचा धोका निर्माण झाला असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. याकरिता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील वसई, पालघर व डहाणू तालुक्यातील सर्व उद्योग, खाजगी कार्यालये, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश काढले आहेत. ह्या 1 दिवसांच्या शट डाऊनमध्ये कुठलेही सांडपाणी अथवा वायू उत्सर्जन करु नये असे आदेशात नमूद करण्यासाठी आले आहे. अत्यावश्यक सेवा व अत्यावश्यक दुकाने मात्र सुरु ठेवण्यात येणार आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments