भावेश बटूकभाई देसाई आत्महत्या प्रकरणी : पत्नीसह एकास अटक

0
1510

दि. 30: डहाणू शहरातील भावेश बटूकभाई देसाई (41) ह्या इसमाने, 14 मे रोजी तन्ना कंपाउंड, सरावली येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मनमिळाऊ स्वभावाच्या भावेश ह्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली होती. ही आत्महत्या पत्नीच्या चारित्र्याच्या संशयाने केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी भावेशची पत्नी देविना व अजय धोडी या इसमास भावेशला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे.


Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता. https://imjo.in/vq7QpV 
(तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

14 मे रोजी भावेश याने आत्महत्या करण्यापूर्वी 13 मे च्या मध्यरात्री 1.00 वाजता अजय धोडी भावेशच्या घरी आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रण झाले होते. हे चित्रण डहाणू पोलीसांकडे सादर केल्यानंतर 25 मे रोजी देविना भावेश देसाई व अजय धोडी यांच्याविरुद्ध गुन्हा (क्र. 114/2020) दाखल करण्यात आला. लगेचच अजय धोडी यास अटक करण्यात आली व न्यायालयासमोर हजर केले असता 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. त्याची चौकशी केल्यानंतर 28 मे रोजी देविना हिला अटक करण्यात आली. तीला 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली होती. 29 मे रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून न्यायालयाने जामीन फेटाळला आहे.

देविना देसाई व अजय धोडीवर काय आरोप आहेत?
अजय धोडी हा भावेशचा मित्र होता व भावेशकडे त्याचे जाणेयेणे होते. अजय व देविना यांच्यात 6/7 महिन्यांपासून प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा भावेशला संशय होता. त्यावरुन भावेश व देविनामध्ये भांडणे होत होती. देविना भावेशशी नीट वागत नव्हती व अजय धोडीचा नाद सोडायला तयार नव्हती. अखेर भावेशने ह्या समस्येला कंटाळून आत्महत्या केली.

Print Friendly, PDF & Email

comments