डहाणू: दारुचा साठा बाळगल्याप्रकरणी शिवसेना तालुकाप्रमुखास अटक

0
1621

दि. 29 मे: शिवसेनेचा तालुका प्रमुख अशोक माधव भोईर यास कासा पोलिसांनी दमण बनावटीच्या दारुचा साठा बाळगल्याच्या आरोपाखाली काल (28) अटक केली आहे. त्याच्याकडून 18 हजार मुल्याचे किरकोळ स्वरूपाचे विदेशी मद्य जप्त करण्यात आले असले त्यांची 14 लाखांची एमएच 48 बीएच 9106 क्रमांकाची (होंडाई क्रेटा) कार जप्त करण्यात आली आहे. भोईर सायवन मार्गे कासा येथे येत असताना वाघाडी येथे ही कारवाई करण्यात आली.

वाढदिवसाच्या पार्टीची तयारी पडली महागात!
अशोक भोईर हे शिवसेनेचे आक्रमक असे पदाधिकारी असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यादिवशी ते सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्याबरोबर रोजगार हमी योजनेच्या कामांच्या पहाणी दौऱ्यावर होते. तेथून परतताना त्यांना मद्य विक्री होत असल्याचे आढळले. 15 जून रोजी त्यांचा वाढदिवस असतो. त्यानिमित्ताने कार्यकर्ते येत असतात. लॉक डाऊन वाढतेच आहे. अशा परिस्थितीत 15 जून रोजी मद्य मिळेल, न मिळेल. त्यापेक्षा थोडेफार पार्टीसाठी घेऊन ठेवू , असा विचार केला आणि सीमेवर सहजगत्या उपलब्ध झालेले मद्य खरेदी केले. बऱ्याचवेळा तस्करच पोलिसांना टीप देतात. भोईर अलगद अडकले आणि चर्चेचा विषय ठरले.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

Print Friendly, PDF & Email

comments