लॉकडाऊन: 22 मे पासून नव्या मार्गदर्शक सूचना लागू

0
973

आता फक्त दोन झोन मध्ये विभागणी!
रेड झोनमध्ये व प्रतिबंधीत क्षेत्रात निर्बंध, अन्यत्र निर्बंध शिथील

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV (तुम्ही Direct 9822283444 ह्या क्रमांकावर Paytm देखील करु शकता)

RAJTANTRA Media/पालघर, दि. 20: कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यातील मार्गदर्शक सूचना आज शासनाने जाहिर केल्या असून त्या 22 मे पासून लागू होणार आहेत. त्यामध्ये रेड झोन आणि नॉन रेड झोन असे दोन भाग केले आहेत. मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर प्रदेश परिसरात समाविष्ट असलेल्या विरार वसई महापालिका क्षेत्राचा समावेश रेड झोन मध्ये करण्यात आला असून उर्वरीत पालघर जिल्हा हा नॉन रेड झोन म्हणून घोषित केला आहे.

विशेष म्हणजे कुठल्याही जिल्हा अथवा महापालिका प्रशासनाला ह्या सूचनांमध्ये बदल करता येणार नसून, बदल करायचा असल्यास मुख्य सचिवांच्या मान्यतेशिवाय स्वतंत्र आदेश काढता येणार नाही. ह्या पूर्वी विविध जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या भूमिका आणि एका जिल्ह्यातील विविध भागातही वेगवेगळ्या भूमिका जाहीर केल्या जात होत्या. आता तसा भेद करण्यासाठी मुख्य सचिवांची परवानगी लागेल.

रेड झोनमध्ये पावसाळ्यापूर्वीची कामे, देखभाल, निगा आणि दुरुस्तीसाठी दुकाने, मॉल, आस्थापना, उद्योग यांना सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली असली तरी कुठलेही वाणिज्यिक व्यवहार केले जाणार नाहीत. जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

शाळा, महाविद्यालये, शिक्षण संस्था, प्रशिक्षण देणाऱ्या संस्था विविध वर्ग (क्लासेस) यांना बंदी कायम असून ऑनलाईन/ ई- लर्निंग पद्धतीने शिक्षणाला उत्तेजन देण्यात येईल.

ठराविक बस डेपो, रेल्वे स्थानके आणि एअरपोर्ट येथील कॅन्टीन व्यवस्था सुरू राहील. याव्यतिरिक्त बाकी सर्व उपहारगृहे आणि हॉटेल्स मात्र बंद राहणार असली तरी उपहारगृहातील घरपोच व्यवस्था सुरु राहील.

हे वाचा: – मा. गृहमंत्री महोदय, ” त्या ” तृतीयपंथीयांना आपल्या शुभहस्ते मदत द्यायची आहे.

कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी निर्धारित केलेल्या राष्ट्रीय मार्गदर्शक सूचना व तरतुदी राज्यभरात कायम राहतील.

हे वाचा:- नरपड ग्रामपंचायतीचा एअर कंडीशनर कोणी चोरला?

रात्रीची संचारबंदी: अत्यावश्यक सेवा वगळता रात्री 7 ते सकाळी 7 वाजता या दरम्यान पूर्वीप्रमाणेच संचारबंदी लागू असेल.

हे वाचा:- डहाणू नगरपरिषद: डॉ. द्वासेंची बदली झाली, खूर्ची घरी नेली!

ज्येष्ठ नागरीक, बालकांची सुरक्षा: 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, गरोदर महिला आणि 10 वर्षाखालील मुले यांना अत्यावश्यक किंवा वैद्यकीय कारण वगळता घराबाहेर पडण्यास अनुमती नाही.

रेड झोनमध्ये वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:
 • दुचाकी वाहने : फक्त 1 (स्वतः चालक)
 • तीनचाकी वाहन : परवानगी नाही
 • चारचाकी वाहन : 1 (चालक) अधिक 2 (प्रवासी)

कंटेनमेंट झोन्स: केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना लक्षात घेऊन संबंधीत महापालिका किंवा जिल्हा प्रशासन हे त्यांच्या भागातील रेड झोन, नॉन रेड झोन तसेच कंटेनमेंट झोन निश्चित करतील. महापालिका क्षेत्रात आयुक्त आणि जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी यांना कंटेनमेंट झोन निश्चित करण्याचे अधिकार देण्यात येत आहेत. निवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपट्टी, इमारत, इमारतींचा समूह, गल्ली, वॉर्ड, पोलीस ठाण्याचे क्षेत्र, गाव किंवा गावांचा छोटा समूह असे कंटेनमेंट झोनचे क्षेत्र असू शकेल. यापेक्षा मोठे क्षेत्र (संपूर्ण तालुका किंवा संपूर्ण महापालिका क्षेत्र इत्यादी) कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करायचे असल्यास, मुख्य सचिवांशी सल्लामसलत करावी लागेल. कंटेनमेंट झोन क्षेत्रात फक्त अत्यावश्यक बाबींसंदर्भातील कार्याला परवानगी दिली जाईल. वैद्यकीय कारण आणि अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा वगळता अन्य कोणत्याही कारणासाठी या क्षेत्रातील लोकांना बाहेर जाण्या-येण्यास पूर्णत: प्रतिबंध करण्यात येणार आहे.

हे वाचा: – डहाणू तालुक्यातील वाकी प्रतिबंधित क्षेत्र घोषित

सर्व क्षेत्रातील, आणिबाणिच्या कामासाठी येणारे कर्मचारी (आरोग्य आणि वैद्यकीय, कोषागारे, आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, अन्न व नागरी पुरवठा, महापालिका सेवा, एनआयसी, एफसीआय ), त्यांच्या आवश्यकतेनुसार कार्यरत राहतील. संचालनालये आणि आयुक्तालयांसह सर्व शासकीय कार्यालये (उपनिबंधक/ प्रादेशिक परिवहन कार्यालये, उप प्रादेशिक परिवहन कार्यालये सुरु राहतील.

अशैक्षणिक कार्यासाठी उपयोगात येणारे विद्यापीठीय आणि महाविद्यालयांचे कर्मचारी, पेपर तपासणी, मूल्यमापन,निकाल आणि ई-कंटेट (आशय) ची निर्मिती करणारे कर्मचारी कार्यालयात येऊ शकतील. मात्र एकूण मनुष्यबळाच्या ५ टक्के किंवा जास्तीत जास्त 10 व्यक्ती (जी संख्या अधिक असेल ती.) या प्रमाणातच अशा कर्मचाऱ्यांची उपस्थिती कार्यालयात राहणे आवश्यक राहील.

आरोग्य सेतू ॲपचा वापर : आरोग्य सेतू ॲप हे कोरोना संसर्गाच्या संभाव्य जोखमीची लवकर ओळख करण्यास मदत करते. कार्यालये आणि कामाच्या ठिकाणी सुरक्षितता ठेवण्याच्या दृष्टीकोनातून मोबाइल फोन असलेल्या सर्व कर्मचार्‍यांना आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, व कार्यालय प्रमुखांवर खात्री करण्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे.
नागरिकांनीही त्यांच्या मोबाइल फोनवर आरोग्य सेतू ॲप डाऊनलोड करावे व त्यांच्या आरोग्य स्थितीची माहिती त्यावर अद्यावत ठेवावी असा सल्ला देण्यात आला असून आजाराचा धोका असलेल्या व्यक्तिला या ॲपमुळे वेळेवर वैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होईल.

विशिष्ट प्रकरणांमध्ये व्यक्ती आणि वस्तू/ मालाची वाहतूक सुनिश्चित करण्यासाठी निर्देश :-
 • डॉक्टर्स, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि रुग्णवाहिकांना कोणत्याही प्रकारच्या निर्बंधाशिवाय राज्यातल्या राज्यात आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी परवानगी मिळेल.
• सर्व प्रकारच्या जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक व , मालवाहतूक करणाऱ्या आणि रिकाम्या ट्रक यांना राज्यातल्या राज्यात येण्या – जाण्यास सर्व यंत्रणांना परवानगी मिळेल.
 • शेजारील देशांसोबत जे करार करण्यात आले आहेत त्या अंतर्गत होणाऱ्या कोणत्याही वस्तू किंवा माल-वाहतुकीस आपल्या सीमेवर प्रतिबंध करण्याचा अधिकार कोणत्याही यंत्रणेला नसेल.

रेड झोन व्यतिरिक्तचे क्षेत्र:
 • परवानगी असलेल्या बाबी करण्यासाठी कोणत्याही शासकीय प्राधिकाऱ्याकडून अनुमती, मंजुरी घेण्याची आवश्यकता नाही.
 • क्रीडा संकुल, खेळाचे मैदान आणि अन्य सार्वजनिक खुल्या जागा या व्यक्तिगत व्यायामासाठी खुल्या राहतील; तथापि, प्रेक्षक आणि समूह व्यायामप्रकार किंवा खेळ आदींना अनुमती नसेल. सर्व शारीरिक व्यायाम इत्यादी हे योग्य शारीरिक अंतराचे (सोशल/ फिजिकल डिस्टंसिंग) नियम पाळून करता येतील.

सर्व सार्वजनिक आणि वैयक्तिक वाहतुकीचे व्यवस्थापन खालीलप्रमाणे करावे:
 • दुचाकी वाहने : फक्त 1 (स्वतः चालक)
 • तीनचाकी वाहन : 1 (चालक) + 2 (प्रवासी)
 • चारचाकी वाहन : 1 (चालक) + 2 (प्रवासी)
 • जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक ही आसनक्षमतेच्या कमाल 50 टक्के क्षमतेनुसार चालविण्यास परवानगी राहील. तथापि, बसमध्ये योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन होण्यासह बसचे निर्जंतुकीकरण (सॅनिटायजेशन) करणे आवश्यक राहील.

सर्व दुकाने (मार्केट/शॉप्स) चालू ठेवता येतील. कुठेही गर्दी किंवा योग्य शारीरिक अंतराच्या नियमांचा भंग होत असल्याचे निदर्शनास आल्यास अशी दुकाने तात्काळ बंद करण्याचे आदेश प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून देण्यात येतील.

कुठल्याही व्यक्तींकडून या आदेशातील सूचनांचे उलल्ंघन झाल्यास त्याविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 ते 60 नुार कारवाई केली जाईल. त्यासोबतच कलम भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार कायदेशीर कारवाईस पात्र राहील. तसेच अन्य कायदेशीर कारवाई देखील केली जाईल.

Print Friendly, PDF & Email

comments