दि. 19: डहाणू तालुक्यातील कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या आता 11 झाली आहे. वाकी ब्राह्मणपाडा येथील 39 वर्षीय स्त्री मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात परिचारिका म्हणून सेवेत आहे. तीच्यामध्ये SARI / ILI (कोरोना सदृश्य) ची लक्षणे आढळल्यानंतर घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले असता, अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. त्यानंतर आजपासून मौजे वाकी (ब्राह्मणपाडा, डोंगरीपाडा) क्षेत्र प्रतिबंधीत म्हणून जाहीर करण्यात आले आहे. ह्या क्षेत्रात आता कोणालाही प्रवेश मिळणार नाही व ह्या क्षेत्रातून कोणालाही बाहेर पडता येणार नाही. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा प्रशासनातर्फे केला जाणार आहे.
पालघर जिल्ह्याची कोरोना विषयक आकडेवारी:
जिल्ह्यामध्ये आज सायंकाळी 6 वाजेपर्यंत 404 पॉझिटीव्ह रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यातील 219 व्यक्ती पूर्णपणे बऱ्या झाल्या असून, 17 जणांचा मृत्यू झाला आहे.
तालुकानिहाय आकडेवारी:
विरार वसई महानगरपालिका क्षेत्र – 355 (13 मृत्यू)
वसई ग्रामीण क्षेत्र – 14 (1 मृत्यू)
पालघर तालुका – 21 (2 मृत्यू)
डहाणू तालुका – 11
वाडा तालुका – 3