मुख्यालयात न रहाणाऱ्या व प्रतिबंधीत क्षेत्रातून रोज ये – जा करणाऱ्या हेवीवेट ग्रामसेवकावर कोण देखरेख ठेवणार?

0
963

दि. 17: जिल्हाधिकारी यांनी बाहेरुन आलेल्या व्यक्तींवर देखरेख ठेवण्यासाठी व त्यांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखाली समित्या गठीत केल्या असून, ग्रामसेवक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. ह्या समित्यांवर प्रतिबंधीत क्षेत्रातून कोणाला येऊ न देणे व प्रतिबंधीत क्षेत्रात प्रवेश करु न देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र डहाणू तालुक्यातील आशागड व चिखले ग्रामपंचायतीचा हेवीवेट ग्रामसेवक मनोज सारंगधर इंगळे हा मुख्यालयात रहात नसून विरार वसई महापालिका रेड कॅटेगरी क्षेत्रातून जा – ये करीत आहे. त्याच्यावर कोणी देखरेख ठेवायची हा प्रश्न उपस्थित झाला आहे. ग्रामसेवक इंगळेच्या विरोधात पंचायत समिती सदस्या सौ. रोहिणी सचिन निमला यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही दखल घेण्यात आलेली नाही.

बाहेरुन आलेल्यांवर देखरेख ठेवण्यासाठी सरपंच व नगरसेवकांच्या समित्या

नरपडच्या ग्रामसभेला ग्रामसेवक गैरहजर; ग्रामस्थांची कारवाईची मागणी

Print Friendly, PDF & Email

comments