दि. 17: कोरोना प्रतिबंधक उपाय म्हणून लॉक डाऊन 4 जाहीर होत असताना, बाहेर गावाहून आलेल्या होम क्वारन्टाईन व्यक्तींवर देखरेख ठेवण्यासाठी नगरपालिका क्षेत्रात प्रत्येक प्रभागात समित्या गठीत करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे. प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक हे प्रभागस्तरीय समितीचे अध्यक्ष असतील. एकाच प्रभागातील उर्वरित नगरसेवक समितीचा सह अध्यक्ष असेल आणि मुख्याधिकारी हे समितीचे सदस्य सचिव असतील. नगराध्यक्ष सर्व समित्यांवर पर्यवेक्षण करतील. ग्रामपंचायत स्तरावर, सरपंच हे अध्यक्ष व ग्रामपंचायत सदस्य, तलाठी, कोतवाल, आशा कार्यकर्ते, शाळेचे मुख्याध्यापक हे समितीचे सदस्य आणि ग्रामसेवक हे सदस्य सचिव असतील.
ह्या समित्या बाहेरून आलेल्या व्यक्तीची नोंद करतील व तहसिलदार/गटविकास अधिकारी यांना अहवाल सादर करतील. अशा व्यक्तींना स्थानिक पातळीवर इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन करतील व त्यांची आरोग्य तपासणी केली जाते आहे किंवा नाही हे तपासतील. प्रतिबंधीत क्षेत्रातून कोणी व्यक्ती येणार नाही व प्रतिबंधीत क्षेत्रात कोणी जाणार नाही, याची दक्षता घेतील.