डहाणू नगरपरिषद: मुख्याधिकारी द्वासेंची शेवटचा हात साफ करायची संधी हुकली

0
1553

दि. 11: डहाणूचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची तडकाफडकी बदली झाल्याचे आदेश अचानक धडकल्यानंतर फारसे कार्यालयात न फिरकणारे व लॉकडाऊनचा आनंद घेणारे द्वासे सायंकाळी 6.45 वाजेपर्यंत कार्यालयात बसून होते. कमिटमेंट पूर्ण करुन घेण्यासाठी, दिवसभर कंत्राटदारांची वर्दळ सुरु होती. लॉकडाऊनचा पुरेपूर फायदा घेत घरी बसणारे अभियंता मिश्रा व काही विश्वासातील कर्मचाऱ्यांना बोलावण्यात आले होते. बिले रेकॉर्डींग करण्याच्या फाईल उपसल्या जात होत्या. जुन्या पूर्तता केल्या गेल्या. काही कंत्राटदारांच्या तोंडाला लाळ सुटली होती. मात्र अचानक दैनिक राजतंत्रची बातमी धडकली आणि क्षणात व्हायरल झाली. आणि मग बिले काढणारी यंत्रणा थबकली. नगरपालिकेचे किमान 1 कोटी रुपये तिजोरीत राहिले. उलट कॉन्क्रीट मध्ये दगड टाकून गफला करणाऱ्या कंत्राटदाराला दगडी भेसळ असलेले बांधकाम पाडून नवे बांधकाम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. स्वतःच्या अंगावरील जबाबदारी झटकण्याच्या उद्देशाने विजयकुमार द्वासें नोटीस काढण्यास मजबूर झाले.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

ह्या कामाचे काय? पारनाका ते फोर्ट दरम्यान 1 कोटी रुपये खर्चाच्या रस्ता मजबुतीकरणाच्या कामात, रस्त्याच्या कडेला थोडेसे उकरुन त्यात खडी रचून रुंदीकरण केले जात आहे. मुरुम औषधाला नाही. कंत्राटदार भाविन शहा व दिनेश पारेख यांनी निविदा मॅनेज करुन 10% अधिक दराने काम मिळवले आहे. केवळ भ्रष्ट्राचार करण्यासाठी कॉन्क्रीटवर डांबरीकरण करण्यात येत आहे. रस्ता किती टिकेल याविषयी तज्ञांना साशंकता आहे.

डहाणूचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे यांची उचलबांगडी

हे देखील वाचा : ….. डॉक्टरकी विसरुन अधिकार डोक्यात गेलेले डहाणू नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजयकुमार द्वासे

हे देखील वाचा : ….. प्रशासनाच्या आडमुठे धोरणामुळे
डहाणूचा भाजीपाला ठप्प होण्याच्या मार्गावर

Print Friendly, PDF & Email

comments