तिसरे लॉकडाऊन आणि त्यानंतरची खबरदारी! – इंडियन मेडीकल असोसिएशन (डहाणू)

0
1213

इंडियन मेडीकल असोसिएशन, डहाणू तर्फे 16 मार्च 2020 रोजी राजतंत्र ह्या दैनिकात करोना विषाणू बद्दल व त्याचा प्रादुर्भाव रोखण्या साठीचे उपाय व घेण्याची काळजी बद्दल एक लेख लिहिला गेला होता. त्या मध्ये आमच्या काही डॉक्टर्स चे फोन नंबर पण दिले गेले होते. काही नागरिकांच्या शंका व प्रश्नांचे समाधान ह्या सुविधे द्वारे केले गेले. ह्याच बरोबर डहाणू व जवळच्या परिसरातल्या अनेक क्लिनिक व दवाखान्यात एक विषाणू संसर्ग रोखण्याचे मार्ग दर्शवणारे banner (माहितीफलक) लावले गेले, जेणे करून सर्व रुग्णांना काळजी घेण्यासाठी प्रवृत्त करता आले. ह्या सगळ्या गोष्टी होत्या लॉकडाऊन पूर्वीच्या!

नंतर चालू झाले लॉकडाऊन! सगळ्यांचे बाहेर जाणे बंद झाले. दुकाने बंद झाली. फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या. ह्या काळात डहाणूतील बहुतेक सर्व रुग्णालये चालू ठेऊन डहाणूच्या डॉक्टर्सनी रुग्ण तपासणे व गरज भासल्यास दवाखान्यात दाखल करून घेऊन औषधोपचार करणे चालू ठेवले. Telemedicine व फोन वर रुग्णांशी बोलून त्यांना औषधे देणे, हे देखील करण्यात आले. हे सगळे करण्याचे कारण, लोकांना एकमेकांपासून लांब ठेवणे, जेणे करून करोना विषाणूचा फैलाव रोखता येईल. लॉकडाऊनचा अपेक्षित परिणामही झालेला दिसतो आहे.

लॉकडाऊन 1, 2 व आता 3 चालू झाले आहे. पण फरक असा आहे कि, आताच्या लॉकडाऊन मध्ये काही शिथिलता आणली गेली आहे. काही प्रमाणात उद्योग धंदे, दुकाने, लोकांची ये जा ह्या गोष्टींना सूट दिली गेली आहे.

पण सावधान!
करोना गेला ह्या भ्रमात कृपया राहू नका!

करोना विषाणू अजून आपल्या मध्ये आहे व निदान अजून 6 महिने आपल्याला ह्याच्या पासून सुटका नाही. लॉकडाऊन मुळे करोना चा प्रादुर्भाव कमी झाला आहे ह्यात वाद नाही. करोना संक्रमित रुग्णांची काळजी व औषधोपचार करण्यासाठी आपल्याला लागणारी औषधे, ventilators, रुग्णालये ह्याची तयारी व जमवाजमव करण्यास वेळ नक्कीच मिळाला आहे.
लॉकडाऊन संपले म्हणजे करोना गेला, असे बिलकुल नाही हे सर्व नागरिकांनी लक्षात घेणे अत्यावश्यक आहे.

उलट आपली जबाबदारी वाढली आहे. आता आपण कसे वागावे ?
1) वारंवार साबण आणि पाण्याने हात धुणे. हँड सॅनीटायझर (Hand sanitizer) पण वापरण्यास हरकत नाही.
2) सगळ्यांनी स्वतःचे नाक तोंड मास्क ने अथवा रुमालाने झाकूनच बाहेर पडणे. शिंकताना खोकताना नाकातोंडावर रुमाल ठेवणे अथवा स्वतःच्या खाखेत खोकणे.
3) वारंवार नाका तोंडाला हात लावणे टाळणे.
4) एक मेकां पासून निदान तीन फूट लांब राहणे. सोशियल डीसटनसिंग पाळणे.
5) उगाच गर्दी न करणे आणि गर्दीची ठिकाणे टाळणे.
6) पूर्ण शिजवलेलेच शाकाहारी / मांसाहारी अन्न खाणे.
7) चिकन, मटण प्रमाणित दुकानातूनच घेणे.
8) आजारी असलेल्या पाळीव प्राण्यांचा संपर्क टाळणे अथवा लगेच औषधोपचार करणे.
9) सार्वजनिक ठिकाणी अथवा रस्त्यावर थुंकणे टाळणे.
10) कुठल्याही व्यक्तींमध्ये रोगाची काही लक्षणे आढळल्यास रुग्णालयास कळवणे व असल्या व्यक्तींना औषधोपचार घेण्यास प्रोत्साहित करणे.
11) उगाच विना कारण बाहेर फिरायला जाणे टाळणे.
12) जर कुणाला quarantine केलेले असेल किव्हा घरी राहून करोना साठी औषधोपचार चालू असेल तर त्याचे नियम काटेकोरपणे पाळणे. व ह्या गोष्टीची कल्पना तुमच्या डॉक्टरला देणे. तसेच अश्या रुग्णाबाबत कुठलाही भेदभाव न करता त्याला सहकार्य देणे.
13) स्वतःला कॉरोनाचा संसर्ग झाला असेल तर कृपया औषधोपचार करून घेणे. कृपया घाबरून पळून न जाणे.
14) वैद्यकीय व्यावसायिक, पोलीस दल आणि काही इतर सरकारी यंत्रणा करोनाविरोधी लढ्याचे प्रमुख शिलेदार आहेत व ते समाजाच्या आरोग्यासाठी झटत आहेत. हे लक्षात घेणे व त्यांना पूर्ण सहकार्य देणे.

जागरूक नागरिक व्हा. करोना विषाणूचा प्रसार थांबवणे आपल्या हातात आहे हे लक्षात घ्या. आपली नागरिक म्हणून जबाबदारी अजून संपली नाही ह्याचे कृपया भान ठेवा. करोनाविरुद्धच्या लढ्याची प्रमुख सूत्रधार सरकारी वैद्यकीय यंत्रणा आहे. मात्र इतर आजाराने ग्रस्त रुग्णांची जबाबदारी मोठ्या प्रमाणात खाजगी क्षेत्रातील दवाखान्यांवर आहे. डहाणूचे सर्व डॉक्टर्स तुमच्या साठी सतत कार्यरत आहेत हे लक्षात घ्या.

इंडियन मेडिकल असोसिएशन, डहाणू तर्फे जनहितार्थ प्रसिद्ध

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments