Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV
पालघर, दि. 2 मे: पालघर जिल्ह्यातील कोरोना +ve रुग्णांची एकूण संख्या आज संख्या 176 वर पोहोचली आहे. मागील 2 दिवसांत ही संख्या 18 ने वाढली असली तरी कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या देखील 14 ने वाढली आहे. नव्या 18 +ve मधील 17 जण वसई महानगर क्षेत्रातील असून 1 जण डहाणू तालुक्यातील गडचिंचले हत्याकांडातील आरोपी आहे. आज जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांच्या उपस्थितीत टिमा हॉस्पिटल (बोईसर) येथील 9 व डहाणू उप जिल्हा रुग्णालयातील 1 कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना घरी सोडण्यात आले. कोरोना मुक्तीकडे वाटचाल करण्यात प्रशासनाला यश येत आहे.
आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 176 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:–
- विरार वसई महानगर क्षेत्र – 149 (त्यातील 8 मृत्यू)
- वसई ग्रामीण क्षेत्र – 2 (1 मृत्यू)
- पालघर तालुका – 16 (त्यातील 1 मृत्यू)
- डहाणू तालुका – 9
आतापर्यंत 3182 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 2849 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 333 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
- 176 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (6 %)
- 2673 अहवाल कोरोना निगेटिव्ह (94 %)
- 1978 जण होम क्वारन्टाईन आहेत.
- 212 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
- 93 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
- 72 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
- 3182 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
- 2673 नमुने निगेटिव्ह.
- 333 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
- 176 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 10 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.
सध्या 93 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत.
ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 4
बोळींज हॉस्पिटल – 9
रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) – 27
सेव्हन हिल हॉस्पिटल – 4
टिमा (बोईसर) – 10
अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 13
कौल सिटी आयसोलेशन – 4
रिलायन्स (मुंबई) – 2
भक्ती वेदांत (मीरा रोड) – 1
ब्रीच कॅन्डी (मुंबई) – 1
नायर हॉस्पिटल (मुंबई) – 2
नवनीत हॉस्पिटल (दहिसर) – 1
फोर्टीस हॉस्पिटल (मुंबई) – 1
भाभा हॉस्पिटल – 1
केईएम – 1
सायन हॉस्पिटल – 3
बीएमसी हॉस्पिटल गोरेगांव – 6
हॉरीझॉन (ठाणे) – 1
रहेजा हॉस्पिटल – 1
पालघर ग्रामीण रुग्णालय – 1
गडचिंचले हत्या: 1 आरोपी +Ve निघाला / 20 आरोपी व 23 पोलिसांचे विलगीकरण