गडचिंचले हत्या: 1 आरोपी +Ve निघाला / 20 आरोपी व 23 पोलिसांचे विलगीकरण

0
1459

पालघर जिल्ह्यात गडचिंचले हत्याकांडातील अटकेत असलेल्या 106 आरोपींपैकी एक आरोपी कोरोना पॉझिटीव्ह निघाल्याने खळबळ उडाली आहे. या आरोपीच्या सहवासातील इतर 20 सहआरोपी आणि 23 पोलीस कर्मचाऱ्यांना क्वारन्टाईन करण्यात येत असून या सर्वांच्या घशाचे नमुने तपासणीसाठी घेतले आहेत. कोरोना बाधीत आरोपी हा 55 वर्षीय असून तो दिवशी (वाकी पाडा) येथील रहाणारा आहे. त्यामुळे गडचिंचले परिसरातील सर्वच क्षेत्राच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

या प्रकरणी 106 जणांना अटक झाल्यानंतर पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश झाले होते. त्यानंतर 15/20 आरोपींचे गट बनवून त्यांना विविध पोलिस स्टेशन्सच्या कोठड्यांमध्ये ठेवण्यात आले. असा 21 आरोपींचा गट वाडा येथील पोलीस कोठडीत ठेवण्यात आला होता. या सर्व आरोपींची 18 एप्रिल रोजी अटक केल्यानंतर, कोरोना तपासणी केली असता सर्वांचे चाचणी अहवाल नकारात्मक आले होते. मात्र आता दुसऱ्या अहवालात त्यापैकी एक आरोपीला करोना संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

कोरोना पॉझिटीव्ह आरोपीला कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. मात्र खबरदारी म्हणून त्याला पालघर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले आहे. या आरोपीच्या सोबत असणारे इतर 20 सहआरोपी तसेच त्यांच्याशी संपर्क आलेल्या 23 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे विलगीकरण करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments