पालघर दि 1 : 16 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे घडलेल्या दोन साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येबाबत नागरिकांना काही माहिती असेल तर तात्काळ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) यांना दयावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीबाबत गुप्तता पाळली जाईल असे आवाहन, राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सदर गुन्हयाबाबत लोकांकडे काही महत्वाची माहिती असल्यास किंवा व्हिडीओ रेकॉर्डींग, फोटो अथवा गुन्हयातील सहभागी आरोपीबाबत काही माहिती असल्यास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग कोकण भवन नवी मुंबई यांच्याशी तात्काळ संपर्क साधावा. लोकांना 9870437786 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव किंवा माहिती गुप्त ठेवली जाईल याची हमी देण्यात आली आहे.
माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!
Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV