गडचिंचले हत्याकांड : आणखी 5 जणांना अटक

0
1343

डहाणू दि. 1 मे: गडचिंचले हत्याकांड प्रकरणी सीआयडीने आणखी 5 जणांना अटक केली आहे. अटक आरोपी हे सर्वजण गडचिंचले येथील राहणारे असून त्यामध्ये 2 आरोपी 60 वर्षीय आहेत. सर्व आरोपींना काल (30 एप्रिल) रोजी अटक करुन आज (1 मे) डहाणू न्यायालयासमोर हजर केले असता, सर्वांना 13 मे पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सीआयडीचे उप अधिक्षक इरफान पठाण यांनी आज 5 आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता, सहाय्यक अभियोक्ता, ॲडव्होकेट आर. बी. वळवी यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडून पोलिस कोठडीची मागणी केली. न्यायालयाने मागणी मंजूर केली असून सर्व 5 आरोपींना 13 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपींतर्फे ॲडव्होकेट जावेद मुन्शी यांनी बाजू मांडली.

माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

16 एप्रिल रोजी डहाणू तालुक्यातील कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील, गडचिंचले येथे जमावाने 2 साधू व त्यांचा चालक यांची ठेचून हत्या केली होती. या प्रकरणी आधीच 101 जणांना अटक झाली असून, आता खूनाच्या गुन्ह्यात अटक आरोपींची संख्या 106 झाली आहे. त्याव्यतिरिक्त, गुन्ह्यात सहभागी असलेल्या 9 अल्पवयीन मुलांची बालसुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. गुन्ह्याचा तपास सीआयडी करीत असून कासा पोलिस स्टेशनचे 5 अंमलदारांना निलंबित करण्यात आले आहे तर या पोलिस स्टेशनच्या 35 कर्मचाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या आहेत.

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

Print Friendly, PDF & Email

comments