गडचिंचले तिहेरी हत्याकांड: 101 आरोपींना पुन्हा 14 दिवसांची पोलिस कोठडी

0
976

डहाणू दि. 30: डहाणू तालुक्यातील कासा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी झालेल्या 2 साधू व त्यांच्या चालकाच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 101 आरोपींना डहाणू येथील न्यायालयाने आज पुन्हा 14 दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवले आहे. त्या सर्वांना 17 एप्रिल रोजी अटक करण्यात आलेली आहे.

गडचिंचले हत्याकांड प्रकरणी पोलिसांनी 110 जणांना अटक केली होती. त्यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची रवानगी भिवंडी येथील बाल सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. उर्वरित 101 जणांना 18 एप्रिल रोजी डहाणू येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, त्यांना 30 एप्रिल पर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली होती. ही मुदत संपल्याने आज सर्व आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पुढील 14 दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. आज मृतांच्या निकटवर्तीयांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. ओझा यांनी वकीलपत्र दाखल केले.

मृतांच्या निकटवर्तीयांच्या वतीने वकीलपत्र दाखल करणारे ज्येष्ठ विधिज्ञ पी. एन. ओझा प्रसार माध्यमांशी बोलताना

पोलिसांनी 101 आरोपींना 18 एप्रिल रोजी खूनाच्या गुन्ह्यात अटक केली होती. त्या प्रकरणी 12 दिवसांची पोलिस कोठडीची मुदत संपत असताना आज पोलिसांनी याच प्रकरणात दाखल केलेल्या अन्य गुन्ह्यात तपासासाठी 14 दिवसांची पुन्हा पोलिस कोठडी मागितली व न्यायालयाने मागणी मंजूर केली. पोलिसांनी गडचिंचले प्रकरणी एकूण 3 गुन्हे दाखल केले आहेत.

आज डहाणू न्यायालय परिसरात कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. न्यायालयाकडे जाणारे रस्ते वाहतूकीसाठी बंद करण्यात आले होते. केवळ पोलिस, वकील व पत्रकारांना परिसरात प्रवेश देण्यात आला. पत्रकारांना न्यायालयाच्या आवारात थेट प्रवेश नाकारण्यात आला. 101 आरोपींना विविध पोलिस स्टेशनच्या कोठड्यांमध्ये 15/20 च्या गटात विभागणी करुन ठेवण्यात आलेले आहे.

माननीय मुख्यमंत्री, पालघर जिल्ह्यात All is NOT Well! SP गौरव सिंगांची उचलबांगडी करा!

Print Friendly, PDF & Email

comments