गडचिंचले तिहेरी हत्याकांड: कष्टकरी संघटनेने व्यक्त केला निषेध; कठोर कारवाईची मागणी!

0
1643

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

दि. 27: गडचिंचले येथे 16 एप्रिल रोजी जमावाने 2 साधूंसहीत चालकाला ठेचून मारल्याच्या घटनेचा कष्टकरी संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त केला असून असे कृत्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. कष्टकरी संघटना आरोपींना जामीन मिळावा यासाठी कुठलेही प्रयत्न करीत नसल्याचा खूलासा देखील संघटनेचे पदाधिकारी ब्रायन लोबो यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे. सोशल मिडीयाबर अफवा व विकृत माहिती पसरविणाऱ्यांवर देखील कारवाईची मागणी केली आहे.

गडचिंचले हत्याकांड प्रकरणी दिनांक 17 एप्रिल रोजी पोलिसांनी 110 जणांना अटक केली होती. त्यातील 9 जण अल्पवयीन असल्याने त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली, तर 101 जणांना 18 एप्रिल रोजी डहाणू येथील न्यायालयात हजर केले असता, त्यांना 12 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. ग्रामीण भागातील कष्टकरी संघटनेचे प्राबल्य लक्षात घेता आरोपींना जामीन मिळावा यासाठी संघटनेचे संस्थापक प्रदीप प्रभू पुढाकार घेतील अशी अटकळ बांधली जात होती. तशा बातम्या सोशल मिडीयाद्वारे प्रसारित होत होत्या. या चर्चांना कष्टकरी संघटनेतर्फे पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

त्या आरोपींचे वकील नीरव चोरडीया
गडचिंचले येथील हत्याकांड प्रकरणी, अटक करण्यात आलेल्या 101 आरोपींतर्फे न्यायालयात डहाणूतील वकील नीरव चोरडिया यांनी बाजू मांडल्याचे समोर आले आहे. या आरोपींना 12 दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

कष्टकरी संघटनेला भूमिका मांडायला इतके दिवस का लागले? ब्रायन लोबो यांना हा प्रश्न विचारला असता त्यांनी दिलेले उत्तर असे आहे:- ” 2/3 दिवसांपासून काही लोक सोशल मिडीयाच्या माध्यमातून कष्टकरी संघटनेला बदनाम करणाऱ्या पोस्ट प्रसारित करीत असल्याने भूमिका मांडली आहे. उलटपक्षी आम्ही 15 एप्रिल रोजी अफवांचा प्रकार प्रशासनाच्या निदर्शनास आणून त्यासाठी मदत द्यायची तयारी दर्शवली होती. 15 तारखेला आंबोली येथे 2 मजूरांना अफवेमुळे मारहाण झाल्यानंतर कासा येथील पोलिस अधिकारी आनंद काळे यांच्याशी बोललो व लोकांना समजावण्याची व गैरसमज दूर करण्यासाठी सहयोगाची तयारी दाखवली होती. मात्र पोलिसांनी मनावर घेतले नाही!”

कष्टकरी संघटनेच्या प्रसिद्धी पत्रकातील प्रमुख मुद्दे:
  गडचिंचले हत्याकांड प्रकरणी कष्टकरी संघटनेचा काहीही संबंध नाही.
 • आरोपींच्या जामीनासाठी कष्टकरी संघटनेतर्फे कुठलेही प्रयत्न केले जात नाही.
  कष्टकरी संघटना ही मिशनरी संघटना नाही अथवा कुठल्याही मिशनरी संघटनेशी संबंधित नाही.
  कष्टकरी संघटना ही माओवादी किंवा नक्षलवादी संघटना नाही.

Print Friendly, PDF & Email

comments