जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह संख्या 97; मृत्यू 5; आजारातून बरे झाले 7

0
1488

Rajtantra Loyal Readers Club चे सदस्य व्हा! 300 रुपये भरून आमचे ई वर्गणीदार बना! महत्वाच्या बातम्यांचे Updates मिळवा! त्यासाठी खालील Link ला Click करा! तुम्ही Paytm / Net Banking / Debit Card द्वारे पैसे अदा करु शकता.
https://imjo.in/vq7QpV

पालघर, दि. 18 एप्रिल: पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची संख्या आता 97 वर पोचली आहे. त्यामध्ये एकट्या वसई तालुक्याची संख्या 80 असून, पालघर तालुक्यात 10 व डहाणू तालुक्यात 7 कोरोना पॉझिटीव्ह निष्पन्न झाले आहेत. डहाणू तालुक्यातील या आधी पॉझिटीव्ह निष्पन्न झालेल्या 3 वर्षीय मुलीचा दुसरा अहवाल निगेटिव्ह आला असला तरी त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. बाधीत मुलीच्या आई वडिलांचा देखील तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. मात्र या मुलीचे पालघर तालुक्यातील काटाळे गावाच्या ज्या वीटभट्टीवर वास्तव्य होते, त्या परिसरात वास्तव्य करणाऱ्या 9 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यातील 5 जण हे काटोळे येथील असून आज नव्याने भर पडलेले 4 जण रानशेत (डहाणू) येथील आहेत. आज निष्पन्न झालेल्या 4 जणांमध्ये 45 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय स्त्री व 7 आणि 3 वर्षीय मुलींचा समावेश आहे.

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या 97 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे:

 • विरार वसई महानगर क्षेत्र – 77 (त्यातील 4 मृत्यू)
 • वसई ग्रामीण क्षेत्र – 3
 • पालघर तालुका – 10 (त्यातील 1 मृत्यू)
 • डहाणू तालुका – 7

आतापर्यंत 1469 लोकांच्या घशाचे नमुने तपासले. त्यातील 806 तपासणी अहवाल प्राप्त झाले. 782 अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.

 • 97 अहवाल कोरोना पॉझिटीव्ह (12%)
 • 709 अहवाल कोरोना निगेटिव्ह (88%)


सध्या 111 रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. ठाणे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय – 11; जसलोक (मुंबई) – 5; एमजीआरएम (पवई) – 1; बोळिंज हॉस्पिटल (वसई) – 6 (आयसोलेशन – 13); डहाणू उप जिल्हा रुग्णालय – 4 (1 पॉझिटीव्ह व 3 संशयीत); ग्रामीण रुग्णालय (पालघर) – 10 (संशयीत); रिद्धीविनायक हॉस्पिटल (नालासोपारा) 11 ; सेव्हन हिल्स हॉस्पिटल 5; हॉरिझोन प्राईम हॉस्पिटल (ठाणे) – 4; शताब्दी हॉस्पिटल (कांदिवली) – 1: अग्रवाल हॉस्पिटल (वालिव) – 9; टिमा हॉस्पिटल – 14 ; कोकिलाबेन हॉस्पिटल – 1; कौल सिटी आयसोलेशन सेंटर – 16.

 • 745 जण होम क्वारन्टाईन आहेत.
 • 125 जणांना इन्स्टीट्यूशनल क्वारन्टाईन केलेले आहे.
 • 111 रुग्ण लक्षणे आढळल्यामुळे रुग्णालयात दाखल.
 • 1469 जणांचे घशाचे नमुने घेतलेले आहेत.
 • 709 नमुने निगेटिव्ह.
 • 782 तपासणी अहवाल प्राप्त होणे बाकी बाकी आहे.
 • 97 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह. व त्यातील 5 पॉझिटीव्ह रुग्णांचा मृत्यू.
Print Friendly, PDF & Email

comments