डहाणूचे नायब तहसीलदार स्वतःच मास्क वापरत नाहीत.

डहाणू 16.04.2020: मच्छीमारीसाठी गेलेल्या आणि गुजरातच्या हद्दीत फसलेले हजारो आदिवासी खलाशी परतत आहेत. त्यांना डहाणूतील सेन्ट मेरीज हायस्कूल येथे गोळा करुन होम क्वारन्टाईनचे शिक्के मारुन रवाना केले जात आहे. तेथे डहाणूचे नायब तहसीलदार शिंदे हे कुठलाही मास्क किंवा रुमाल न वापरता वावरताना आढळून आले आहेत. (14.04.2020; सायंकाळी 6.30 वा.) जिल्हाधिकारी यांनी 10 एप्रिल रोजी अधिसू्चना काढून पालघर जिल्ह्यात मास्क वापरणे बंधनकारक केलेले आहे. मास्क न वापरणाऱ्याच्या विरोधात IPC च्या 188 कलमान्वये गुन्हा दाखल केला जातो. मग जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्याला सुट आहे का?

यासंदर्भातील Video पहाण्यासाठी या Link ला भेट द्या! …… डहाणूचे नायब तहसीलदार शिंदे स्वतःच मास्क वापरत नाहीत!

Print Friendly, PDF & Email

comments