नवी मुंबई: एसआरपी च्या 11 जवानांना कोरोनाची लागण

0
1184

नवी मुंबई, दि.3:- केंद्रिय सुरक्षा बलाच्या खारघर येथील 139 अधिकारी आणि सेवेसाठी नियुक्त असणाऱ्या 12 कर्मचारी यांच्यापैकी 5 जवानांना कोविड-19 टेस्ट यापुर्वी पॉझिटिव्ह आढळून आली होती. त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त श्री.शिवाजी दौंड यांनी तातडीने आदेश काढून काल रात्री दि. 2 एप्रिल 2020 रोजी उशीरा 146 अधिकारी/कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी मेमोरियल हॉस्पिटल कळंबोली येथे स्वतंत्र विलगीकरण कक्षात ठेवण्याची आदेश जारी केले होते. तात्काळ त्यांची कोविड-19 टेस्ट घेण्यात आली. यापैकी 6 टेस्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

केंद्रिय सुरक्षा बलाच्या जवानांना तात्काळ विलगीकरणात ठेवल्यामुळे संभाव्य धोका कमी झाला आहे. एमजीएम हॉस्पिटलमध्ये त्यांच्यासाठी स्वतंत्र दोन विंग तयार करण्यात आले असून त्यांना आवश्यक असणाऱ्या सर्व सुविधा शासनाने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. प्रशिक्षित वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर लक्ष ठेवून आहेत.

विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांनी या प्रकरणी विशेष लक्ष घातल्यामुळे नवी मुंबई परिसरातील संभाव्य धोका कमी झाला आहे. अन्य जिल्हयात अशाप्रकारे कोणताही पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यास संबंधित प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन त्वरीत कार्यवाही करावी असे आदेश देण्यात आले आहेत.

कोरोना संदर्भात दैनिक राजतंत्रच्या Updates साठी खालील Link ला भेट द्या! Let’s fight with CORONA

Print Friendly, PDF & Email

comments