जिल्ह्यात 8 कोरोना पॉझिटीव्ह, 1 मृत्यू; विनाकारण रस्त्यावर फिरणारी 80 वाहने जप्त

0
852

दि. 1 एप्रिल: पालघर जिल्ह्यात विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 24 तासांत 858 वरुन 964 वर पोचली आहे. काल पालघर तालुक्यात एक पॉझिटीव्ह रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे पालघर तालुक्यात विलगीकरण केलेल्या नागरिकांची संख्या 108 वरुन 199 झाली आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या निकटवर्ती व्यक्तीचा तपासणी अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आल्याने, तीच्यावर पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचार चालू आहेत.
पालघर जिल्ह्यातील पहिला मृत्यू पालघर तालुक्यात झाल्यानंतर, प्रशासनाने खंबीर पावले उचलली असून, स्थानिक, निवासी, अभ्यागत, वारंवार कामानिमित्त वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या हद्दीचा सतर्क रहाण्याच्या क्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. कोणत्याही व्यक्तीला तसेच परदेशातून वसई विरार शहर महानगरपालिका, पालघर नगरपरीषद, सफाळे व बोईसर ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रामध्ये आलेल्या सर्व व्यक्तींना कोणत्याही सार्वजनिक / खाजगी ठिकाणी, परिसरातील रस्ते, हमरस्ते, सार्वजनिक मार्ग या ठिकाणी प्रवेश करणे, फिरणे, उभे राहणे, ताटकळणे, भटकणे तसेच कोणत्याही रस्त्यावर, पारंपारीक व अपारंपारीक इंधनावर चालणाऱ्या वाहनावर बंदी करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी जाहीर केले आहे.
आज एका दिवसात पालघर जिल्हा पोलीस दलाकडून
अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वाहने सोडून, विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून 80 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.

Print Friendly, PDF & Email

comments