पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची आकडेवारी (29.03.2020 रोजीची)

0
914

दि. 29.03.2020: पालघर जिल्ह्यामध्ये आज रोजी (29 मार्च) परदेशात प्रवास केल्याने देखरेखीखाली असलेल्या व्यक्तींची संख्या 114 ने वाढून 739 झाली आहे. त्यातील 60 वर्षे पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींची संख्या 25 इतकीच कायम आहे. यातील तब्बल 281 व्यक्तींचा देखरेखीखाली 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.

कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाय योजना, लॉक डाऊन आणि यासंबंधीच्या बातम्या आता एकाच ठिकाणी! या Link ला नियमित भेट द्या!
Let’s Fight with CORONA…Daily Rajtantra Updates!

कोरोनाबाधेची शंका आल्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या व्यक्तींची संख्या 2 ने वाढून 39 झाली आहे. त्यातील 20 जण हे विदेशवारी केलेले असून, अन्य विदेशवारी न केलेल्या 19 जणांमध्ये तीव्र श्वसन विकाराची लक्षणे आढळली असल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या 11 निकटवर्तीयांसह (20+19+11) एकूण 50 जणांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहेत.
त्यातील 43 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 38 अहवाल निगेटिव्ह आले असून 5 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले सर्व 5 रुग्ण वसई विरार महानगर क्षेत्रातील असून त्यांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आहे.

• डहाणू: तालुक्यात 39 जण देखरेखीखाली असून त्यातील 3 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 21 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले होते व रिपोर्ट निगेटिव्ह आले.
 • पालघर: तालुक्यात 107 जण देखरेखीखाली असून त्यातील 10 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. 62 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 13 प्रवाशांमध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने तपासले असता, 10 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 3 रिपोर्ट प्राप्त होणे बाकी आहे.
 • वाडा: तालुक्यात 21 जण देखरेखीखाली असून त्यातील 14 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 1 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
 • जव्हार: तालुक्यात श्वसन विकाराचा एक नवा रुग्ण आढळला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे. या आधी 1 जण देखरेखीखाली होता. त्याचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झालेला आहे.
 • मोखाडा: येथेही तीव्र श्वसनविकाराचा 1 रुग्ण आढळून आला असून त्याच्या घशाचा नमुना तपासणीसाठी पाठवला आहे. अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
 • विक्रमगड: तालुक्यात 3 जण देखरेखीखाली होते. त्यांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे.
 • तलासरी: तालुक्यात 15 जण देखरेखीखाली असून त्यातील 1 जणाचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. 2 प्रवाशामध्ये लक्षणे आढळल्यामुळे त्याच्या घशाचे नमुने तपासले असता, रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
 • वसई: शहरीकरण झालेल्या या तालुक्यात (ग्रामीण भागात 135 + महानगर क्षेत्रात 416) 551 जण देखरेखीखाली असून त्यातील 12 जण 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे व आजाराचा पूर्वेतिहास असलेले आहेत. त्यातील 192 जणांचा 14 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. कोरोनाची लक्षणे आढळलेले 10, तीव्र श्वसन विकाराचे 9 व कोरोना बाधीत रुग्णांचे निकटवर्ती 11 असे 30 जणांच्या घशाचे नमुने तपासले असता, त्यापैकी 23 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. 5 अहवाल पॉझिटिव्ह आहेत. पॉझिटिव्ह अहवाल आलेले रुग्ण आधीच मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल झालेले आहेत. अन्य 2 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहेत.

आज रोजी (दिनांक: 29 मार्च 2020) सरकारी संकेतस्थळावरील माहिती अशी आहे.
देशभरातील विमानतळांवर एकूण 15,24,266 प्रवाशांची तपासणी करण्यात आली. एकूण 1117 जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यातील 90 जण पूर्णत: बरे झाले असून 1010 जणांवर उपचार सुरु आहेत. 27 जणांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 203 झाली असून त्यामध्ये 3 परदेशी नागरिकांचा समावेश आहे. 25 जण पूर्णत: बरे झाले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे.
नजीकच्या गुजरात राज्यामध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 63 झाली असून 1 जण पूर्णत: बरा झाला असून 5 जणाचा मृत्यू झाला आहे.

Print Friendly, PDF & Email

comments