कोरोना विषाणूवर औषध असल्याचा केला दावा; गुन्हा दाखल!

0
1337

कोरोना विषाणूवर औषध असल्याचा केला दावा! हाजी अब्दुल हमीद खान वर अफवा पसरवल्याप्रकरणी गुन्हा दाखल!
डहाणू तालुक्यातील आशागड गावच्या एका व्यक्तीने स्वतःचा व्हिडिओ प्रसारित केला असून भारत सरकारकडे कोरोना च्या विषाणूवर कुठलाही इलाज नसून आपल्याकडे इलाज असल्याचा दावा केला आहे. स्वतःची ओळख मुस्लिम हाजी अब्दुल हमीद खान अशी देऊन सरकारचा कोणी प्रतिनिधी आल्यास त्याला औषध देण्याची तयारी या इसमाने दर्शवली आहे. सर्व भारतीयांना औषध देऊन बरे केल्यानंतर आपली अट सरकारने मान्य करावी असे तो या व्हिडिओत म्हणत आहे. या इसमाने एका डायरीतून हा मजकूर वाचून दाखवलेला असल्याचे दिसते. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या इसमावर गुन्हा दाखल करुन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

Print Friendly, PDF & Email

comments