प्रा. डॉ. विलास जाधव यांची मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभाग अभ्यास मंडळावर निवड

0
2072

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 17 : गोखले एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ प्रा. डॉ. विलास जाधव यांची मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभागाच्या अभ्यास मंडळावर स्विकृत सदस्य म्हणून निवड करण्यात आली.

डॉ. विलास जाधव मागील 21 वर्षापासून कृषी विस्ताराच्या माध्यमातून पालघर आणि ठाणे जिल्ह्यातील आदिवासी भागात आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार करत असून शेती उत्पादन तसेच शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यात त्यांचे मोठे योगदान आहे.

शेतकर्‍यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी विविध प्रकारचे मेळावे, चर्चासत्रे, कृषी प्रदर्शने, प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन, ग्रामीण भागातील युवकांसाठी स्वयंरोजगार निर्मितीस चालना देणारे उपक्रम तसेच बचत गटाद्वारे महिला सक्षमीकरण कार्यक्रमांसह कुपोषण निर्मूलनासाठी पोषणमूल्य आधारित शेती पद्धती तंत्रज्ञानाचा प्रचार व प्रसार ते करत आहेत.

डॉ. विलास जाधव यांची मुंबई विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाल्याने पालघर जिल्ह्यातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments