जि. प. व पं. स. निवडणूक; जव्हारमध्ये 67.64% मतदान

0
886

प्रतिनिधी/जव्हार, दि. 7 : पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत येणार्‍या आठ पंचायत समित्यांसाठी आज, 7 जानेवारी रोजी जिल्ह्यात मतदान पार पडले. यात जव्हार तालुक्यात एकूण 67.64% मतदान झाले. ईव्हीम मशीनमधील बिघाडाच्या काही किरकोळ घटना वगळता संपुर्ण तालुक्यात सुरळीत मतदान पार पडले. यात दोन बूथवरील मशीनचे डिस्प्ले बंद पडले तर चार बूथवरील मशीनमध्ये काही बिघाड झाल्यामुळे सदर मशीन बदलण्यात आल्या.

दरम्यान, आज सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर काही ठिकाणी मतदानासाठी मोठ-मोठ्या रांगा लागल्या होत्या. तर काही गावांमध्ये रोजगारामुळे स्थलांतरित झालेल्या मतदारांमुळे मतदानाच्या टक्केवारीत घट झालेली दिसली. यावेळी अपंग मतदारांसाठी निवडणूक आयोगातर्फे व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे अपंग मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावणे सोयीचे ठरले.

Print Friendly, PDF & Email

comments