सुट्टीचे आदेश धाब्यावर, एमआयडीसीतील 90 टक्के कारखाने सुरुच

0
634
संग्रहित छायाचित्र

वार्ताहर/बोईसर, दि. 21 : विधानसभा निवडणूकीमध्ये सर्वच मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी शासनातर्फे आज, 21 ऑक्टोबर रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली होती. मात्र बोईसर एमआयडीसी तसेच पालघरमधील औद्यागिक वसाहतीतील अनेक कारखानदारांनी हे आदेश धाब्यावर बसवून आपले कारखाने सुरुच ठेवल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कामावरुन परतलेल्या कामगारांनी संध्याकाळी मतदान केंद्रांवर गर्दी केल्याचे दिसून आले.

मासवन येथील एस.व्ही.पी. पॅकिंग या खाजगी करखान्यामधील कामगारांना मतदानाकरिता सुट्टी न दिल्याने येथील कामगारांकडून तारापुर कामगार उप आयुक्तांकडे याबाबत लेखी तक्रार करण्यात आली. तर तारापुर औद्योगिक परिसरातील मधुरम फॅब्रिक्स कारखान्यामधील कामगारांच्या तक्रारीनंतर तारापुर कामगार उप आयुक्तांनी थेट कारखाना गाठल्यानंतर सर्व कामगारांना मतदानासाठी सोडण्यात आले. दरम्यान, या तक्रारी सोडल्यास तारापूर एमआयडीसी व पालघर औद्यागिक वसाहतीतील 90 टक्के कारखाने सुरुच असल्याचे दिसुन आले.

Print Friendly, PDF & Email

comments