मी माघार घेतलेली नाही – रमेश मलावकर

0
775

राजतंत्र मिडीया (Breaking, 16.10.2019): मी निवडणूकीच्या रिंगणात कायम असून मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मी कोणाची मते खाण्यासाठी निवडणूक लढवीत नसून जिंकून येण्यासाठी निवडणूक लढवित आहे. मी माघार घेतल्याचे मॅसेज सोशल मिडियावर पसरवून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र मी माघार घेतलेली नाही व कोणालाही पाठिंबा दिलेला नसून मतदारांनी कुठल्याही अफवांना बळी पडू नये असा खूलासा डहाणू विधानसभा मतदारसंघातील भाजपचे बंडखोर उमेदवार रमेश मलावकर यांनी दैनिक राजतंत्रशी बोलताना केला. ते खूलासा करण्यासाठी दैनिक राजतंत्र कार्यालयात आले होते. त्यांच्यासोबत निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण खरपडे देखील उपस्थित होते. खरपडे हे स्वतः विश्व हिंदू परिषदेच्या तलासरी येथील वनवासी कल्याण केंद्राचे माजी विद्यार्थी असून माजी विद्यार्थी संघटनेचे महत्वाचे पदाधिकारी आहेत.

आज पालघरचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डहाणू येथे होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये मालावकर यांच्या माघारीची घोषणा होईल अशी अटकळ बांधली होती. मात्र त्या आधीच मालावकर यांनी खुलासा केल्यामुळे पालकमंत्री याबाबत काय भूमिका घेतात घेतात याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

Print Friendly, PDF & Email

comments