आणखी 17 जुगार्‍यांवर डहाणू पोलिसांची कारवाई

0
1212
  • मसोलीत सुरु होता जुगाराचा अड्डा
  • लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 30 : तालुक्यातील विविध भागात सुरु असलेले जुगाराचे अड्डे सध्या डहाणू पोलिसांच्या निशाण्यावर असुन नुकत्याच चार जुगार्‍यांवर केलेल्या कारवाईनंतर शुक्रवारी (दि. 27) पुन्हा डहाणू पोलिसांनी मसोलीत सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर कारवाई करत 17 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तसेच या जुगार्‍यांकडून लाखो रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मसोलीतील गोपाळ वसंत मेहेर यांच्या घराच्या बाजूला बांधलेल्या शेडमध्ये हा जुगाराचा अड्डा सुरु होता. पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर शुक्रवारी रात्री 8.30 च्या सुमारास या अड्ड्यावर् छापा टाकण्यात आला. यावेळी गोपाळ मेहेर (वय 41) यांच्यासह राजेश भगवानदास दर्जी (वय 49, रा. कंक्राटी), विलास चिंतामण पांडे (वय 58, रा. आशागड), फारुख मोहम्मदअली हीपरगे (वय 48, रा. मसोली), सचिन छोटेलाल शहा (वय 36, रा. डहाणू), सुनिल विक्रम बरड (वय 27, रा. वाणगाव), शारुख अनिफ खान (वय 25, रा. डहाणू), खलील मोहम्मद शफि कुरेशी (वय 50, रा. डहाणू), नंदू जगननाथ मोरे (वय 44, रा. वेवुर-नवली, पालघर), निलेश वसंत मेहेर (वय 37, रा. पारनाका), हेमंत रामचंद्र साने (वय 46, रा. डहाणू), सुरेश महादु नवसरे (वय 43, रा. शिरगाव,पालघर), इलियाज बशीर मेमन (वय 52, रा. डहाणू गाव), आषिश मोहम्मद सैय्यद शेख (वय 45, रा. डहाणू), शहाजहान शेरिशर इराणी (वय 63, रा. डहाणू), भुपेश गजानन अंभिरे (वय 28, रा. डहाणू), सोराब रुस्तम इराणी (वय 66, रा. मुंबई) असे एकुण 17 जण जुगार खेळताना आढळून आले.

पोलिसांनी या जुगार्‍यांकडून सुमारे 2 लाख 33 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असुन सर्वांविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डहाणू पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक ओमासे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Print Friendly, PDF & Email

comments