
राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू, दि. 27 : तालुक्यातील सरावली दुबळपाडा येथे सुरु असलेल्या एका जुगाराच्या अड्ड्यावर काल, गुरुवारी पोलिसांनी छापा टाकत 4 जुगार्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्याविरोधात डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल केले आहेत.
अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरावली दुबळपाडा येथील डांबरी रस्त्याच्या शेजारी उभारलेल्या खुल्या टेम्पररी शेडमध्ये हा जुगाराचा अड्डा सुरु होता. डहाणू पोलिसांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर काल सायंकाळी 6.30 च्या सुमारास याठिकाणी छापा टाकण्यात आला. यावेळी येथे असलम युसुफ शेख (वय 44, रा. डहाणू), कुरबान मुबारक शेख (वय 32), जाकीर निराज मिर्जा (वय 28, दोघे रा. सरावली दुबळपाडा) व समीमअली इमामअली खान (वय 54, रा. सावटा) असे चौघे तीन पत्ती नावाचा जुगार खेळताना आढळून आले. यानंतर पोलिसांनी चौघांनाही ताब्यात घेत त्यांच्याविरोधात महाराष्ट्र् जुगार कायद्याचे कलम 12(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे.