मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी संजीव जोशी यांची बिनविरोध निवड

0
1261

राजतंत्र न्युज नेटवर्क/मुंबई, दि. 8 : अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या सरचिटणीसपदी दैनिक राजतंत्रचे संपादक संजीव जोशी, तर कार्याध्यक्षपदी पुणे येथील सकाळ समुहाचे प्रतिनिधी शरद पाबळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. आज पत्रकार परिषदेच्या मुंबई येथील कार्यालयात याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, निवडणूक निर्णय अधिकारी बापूसाहेब गोरे (पुणे), सहाय्यक निवडणूक अधिकारी अच्युत पाटील (पालघर), पालघर जिल्हा शाखेचे सरचिटणीस हर्षद पाटील उपस्थित होते.

मराठी पत्रकार परिषदेची द्विवार्षिक निवडणूक प्रक्रिया 15 जुलै 2019 पासून सुरू करण्यात आली होती. काल (7) उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीमध्ये कार्याध्यक्ष पदासाठी शरद पाबळे व सरचिटणीस या पदासाठी संजीव जोशी यांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने मराठी पत्रकार परिषदेच्या सन 2019-2021 पाबळे व जोशी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात नवनियुक्त पाबळे व संजीव जोशी यांचा एस. एम. देशमुख व किरण नाईक यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. येत्या 17 व 18 ऑगस्ट रोजी नांदेड येथे होणार्‍या राष्ट्रीय अधिवेशनात कार्यभार स्वीकारला जाणार आहे.

Print Friendly, PDF & Email

comments