बोईसर एमआयडीसीत दोन महिला कामगार आढळल्या मृतावस्थेत

0
1571

राजतंत्र न्युज नेटवर्क/बोईसर, दि. 5 : येथील एमआयडीसीतील वेलियंट ग्लास वर्क कंपनीत दोन महिला कामगारांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. झुमली काळू मावी (वय 45) व वरसुद बाळू मावी (वय 18) अशी सदर महिलांची नावे असुन त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही.

मुळच्या उत्तर प्रदेश येथील रहिवासी व कामानिमित्त बोईसरमध्ये रहावयास असलेल्या झुमली मावी व वरसुद मावी या दोन महिला एमआयडीसीतील वेलियंट ग्लास वर्क या कंपनीत कामाला होत्या. आज, दुपारी नेहमीप्रमाणे दुपारच्या जेवणाची सुट्टी झाल्यानंतर या दोघी जेवणासाठी आल्याच नसल्याचे त्यांच्या सहकार्‍यांनी ते काम करत असलेल्या ठिकाणी जाऊन पाहिले असता दोघीही बेशुद्धावस्थेत आढळून आल्या. यानंतर त्यांना तात्काळ सिटी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र येथील डॉक्टरांनी त्यांना तपासुन मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असुन या मृत्यूंमागचे कारण समजल्यानंतरच खरी घटना समोर येणार आहे.

दरम्यान, या प्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास करण्यात येत आहे.

Print Friendly, PDF & Email

comments