दिनांक 26 May 2020 वेळ 5:17 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: z.p.election

Tag Archives: z.p.election

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी

18 जागांसह ठरला सर्वात मोठा पक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचीही 14 जागांवर मजल राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : मंगळवारी (दि. 7) पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेना 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर मजल मारली आहे. 2015 साली झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकणार्‍या भाजपला ... Read More »

पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा -जितेंद्र आव्हाड

सत्तेची झूल गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्याची केली टीका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात आव्हाडांची वाड्यात प्रचार रॅली व सभा प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : सत्तेची अंगावर असलेली झूल गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप अस्वस्थ झाले असल्याची टीका विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुडूस येथील सभेमध्ये केली. तर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री भाजपचेच असताना देखील त्यांच्या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ... Read More »

सायवन, मोडगाव, हळदपाड्यात लाल बावट्याचा राष्ट्रवादीला पाठिंबा

बंडखोरांची केली हकालपट्टी राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 30 : तालुक्यातील सायवन व मोडगाव जिल्हा परिषद गट तसेच सायवन व हळदपाडा पंचायत समिती गण न लढवता या चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांना संपूर्ण आणि सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या ठाणे व पालघर जिल्हा कमिटीने एकमताने घेतला होता. त्यानुसार सायवन आणि हळदपाडा या पंचायत समिती गणात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ... Read More »

शिवसेना इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्याच्या ठिकाणी

इच्छूक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मुलाखतींचा चेंडू जिल्ह्याच्या रिंगणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दिनेश यादाव/वाडा, दि. 20 : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी शिवसेनेतील इच्छूक उमेदवारांची संख्या पाहता, उमेदवारीवरुन तालुका पातळीवरील संघर्ष टाळण्यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आज, शुक्रवारी (दि. 20 डिसेंबर) पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आल्याने गट व गणातील उमेदवारी वरिष्ठ पातळीवरूनच निश्‍चित ... Read More »

अचानक निवडणुका जाहीर झाल्याने इच्छूक उमेदवारांची दमछाक

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी अचानक पालघर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करुन सुस्थावस्थेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना एका प्रकारे धक्का दिल्याने सर्वच पक्ष खडबडून जागे झाले आहेत. तर इच्छूक उमेदवारांची एकच तारांबळ उडाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पुढील महिन्यात 7 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने ... Read More »

पालघर जिल्हा परिषद निवडणुकीकरीता प्रभाग रचना व आरक्षण सोडत कार्यक्रम जाहीर

वार्ताहर/बोईसर, दि. 5 : सार्वत्रिक विधानसभा निवडणुका संपत नाही तोच पालघर जिल्हा परिषद व त्याअंतर्गत आठ पंचायत समित्यांचा कार्यकाळ येत्या फेब्रुवारी 2020 मध्ये संपत असल्याने आता जिल्ह्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकींकरिता प्रभाग रचना तसेच आरक्षण सोडतीबाबतचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असुन 2011 च्या जनगणनेनुसार जिल्हा परिषदेची सदस्य संख्या 57 ... Read More »

Scroll To Top