दिनांक 21 January 2020 वेळ 5:35 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: wada

Tag Archives: wada

वाडा : मांडूळ तस्करी करणारे चार आरोपी जेरबंद

वाडा वनविभागाची धडक करवाई 30 लाखांचा मांडूळ साप जप्त दिनेश यादव/वाडा, दि. 17 : मांडूळ या दुर्मिळ प्रजातीच्या सर्पाची तस्करी करणार्‍या चौकडीला वाडा वनपरिक्षेत्रा (पश्चिम) च्या अधिकार्‍यांनी सापळा रचून मोठ्या शिताफिने अटक करण्यात यश मिळवले असून या चारही आरोपींविरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाडा वनपरिक्षेत्र पश्चिम विभागाचे परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे यांना गोपनीय सुत्रांकडून, या भागामध्ये ... Read More »

अज्ञात व्यक्तीने शिवसैनिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या

वाड्यात वातावरण तप्त; शिवसैनिक संतापले राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील चिंचघर या गावात गेल्या चार दिवसात शिवसैनिकांच्या तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असून राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहिर झाला आहे. या निकालातून कुडूस गट, कुडूस गण ... Read More »

पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा -जितेंद्र आव्हाड

सत्तेची झूल गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्याची केली टीका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात आव्हाडांची वाड्यात प्रचार रॅली व सभा प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : सत्तेची अंगावर असलेली झूल गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप अस्वस्थ झाले असल्याची टीका विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुडूस येथील सभेमध्ये केली. तर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री भाजपचेच असताना देखील त्यांच्या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ... Read More »

शिवसेना इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्याच्या ठिकाणी

इच्छूक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मुलाखतींचा चेंडू जिल्ह्याच्या रिंगणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दिनेश यादाव/वाडा, दि. 20 : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी शिवसेनेतील इच्छूक उमेदवारांची संख्या पाहता, उमेदवारीवरुन तालुका पातळीवरील संघर्ष टाळण्यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आज, शुक्रवारी (दि. 20 डिसेंबर) पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आल्याने गट व गणातील उमेदवारी वरिष्ठ पातळीवरूनच निश्‍चित ... Read More »

अचानक निवडणुका जाहीर झाल्याने इच्छूक उमेदवारांची दमछाक

प्रतिनिधी/वाडा, दि. 19 : निवडणूक आयोगाने मंगळवारी सायंकाळी अचानक पालघर जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणूकांचा कार्यक्रम जाहीर करुन सुस्थावस्थेत असलेल्या सर्वच राजकीय पक्षांना एका प्रकारे धक्का दिल्याने सर्वच पक्ष खडबडून जागे झाले आहेत. तर इच्छूक उमेदवारांची एकच तारांबळ उडाली आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूका पुढील महिन्यात 7 जानेवारी 2020 रोजी होणार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केल्याने ... Read More »

वसईतील प्रेमीयुगुलाची वाड्यात आत्महत्या

केळठण येथील घटना प्रतिनिधी/कुडूस, दि. 28 : वसई तालुक्यातील योजना पारधी व नितीन भुजड या प्रेमी युगुलाने बुधवारी (दि.27) दुपारच्या सुमारास वाडा तालुक्यातील केळठण गावच्या हद्दीत विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेने हळहळ व्यक्त होत असुन कुटूंबियांचा त्यांच्या लग्नास विरोधात असल्याने दोघांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा संशय व्यक्त करण्यात येतोय. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनंता पारधी (वय 17) ... Read More »

अखेर वनक्षेत्रपालांवर निलंबनाची कारवाई

लाकडाचा विनापरवाना साठा प्रकरण : दिनेश यादव/वाडा, दि. 2 : वाडा-मनोर महामार्गावरील ठाणगेपाडा येथे एका दास्तान डेपोवर विनापरवाना लाकडाचा साठा सापडल्यानंतर याप्रकरणी वनपालांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. मात्र त्यास तेवढेच जबाबदार असलेल्या वनक्षेत्रपाल एच. व्ही. सापळे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नव्हती. मनसेचे स्थानिक कार्यकर्ते देवेंद्र भानुशाली यांनी याबाबतचा पाठपुरावा करून नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक यांची वाडा येथे भेट ... Read More »

Scroll To Top