दिनांक 18 January 2020 वेळ 12:38 PM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: Shivsena

Tag Archives: Shivsena

अज्ञात व्यक्तीने शिवसैनिकांच्या गाड्यांच्या काचा फोडल्या

वाड्यात वातावरण तप्त; शिवसैनिक संतापले राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप प्रतिनिधी/वाडा, दि. 12 : तालुक्यातील चिंचघर या गावात गेल्या चार दिवसात शिवसैनिकांच्या तीन चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याचा प्रकार घडला असून राजकीय वादातून हा प्रकार घडल्याचा आरोप केला जात आहे. तालुक्यात नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा निकाल जाहिर झाला आहे. या निकालातून कुडूस गट, कुडूस गण ... Read More »

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी

18 जागांसह ठरला सर्वात मोठा पक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचीही 14 जागांवर मजल राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : मंगळवारी (दि. 7) पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेना 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर मजल मारली आहे. 2015 साली झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकणार्‍या भाजपला ... Read More »

शिवसेना इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती जिल्ह्याच्या ठिकाणी

इच्छूक उमेदवारांच्या भाऊगर्दीमुळे मुलाखतींचा चेंडू जिल्ह्याच्या रिंगणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दिनेश यादाव/वाडा, दि. 20 : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांसाठी शिवसेनेतील इच्छूक उमेदवारांची संख्या पाहता, उमेदवारीवरुन तालुका पातळीवरील संघर्ष टाळण्यासाठी शिवसेना पदाधिकार्‍यांनी इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती आज, शुक्रवारी (दि. 20 डिसेंबर) पालघर येथे जिल्ह्याच्या ठिकाणी घेण्यात आल्याने गट व गणातील उमेदवारी वरिष्ठ पातळीवरूनच निश्‍चित ... Read More »

जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावर भाजपला खिंडार

मोखाड्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे शिवसेनेत प्रतिनिधी/मोखाडा, दि. 19 : जिल्हा परिषद निवडणूकीच्या तोंडावरच मोखाडा तालुक्यातील भाजपचे माजी तालुकाध्यक्ष विठ्ठल चोथे यांनी भाजपाला रामराम ठोकून शिवसेनेत प्रवेश केल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. विठ्ठल चोथे यांनी आज, गुरुवारी (दि.19) शिवसेनेचे विक्रमगड विधानसभा संघटक प्रल्हाद कदम, सभापती प्रदीप वाघ, माजी सभापती दमयंती फसाळे, उपतालुका प्रमुख वासुदेव खंदारे, पालघर जिल्हा परिषदेचे ... Read More »

पालघर विधानसभा मतदारसंघ : शिवसेनेसमोर विरोधकांचे आव्हान उभे ठाकेल का?

निवडणूक वार्तापत्र (संजीव जोशी) : 130-पालघर हा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असून या मतदार संघात 1 लाख 39 हजार 174 पुरुष, 1 लाख 34 हजार 803 महिला व इतर 17 असे 2 लाख 73 हजार 994 इतके मतदार आहेत. या मतदारसंघात शिवसेनेचे अमित कृष्णा घोडा हे विद्यमान आमदार असून पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारलेली आहे. त्यांच्याऐवजी सेनेने श्रीनिवास चिंतामण वनगा यांना ... Read More »

शिवसेनेने रोखला महामार्ग

>> भिवंडी-वाडा-मनोर रस्त्याच्या निकृष्ट कामांचा विचारला जाब दिनेश यादव/वाडा, दि. 3 : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गाच्या रस्त्याचे काम करणार्‍या सुप्रीम इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केले असल्याने हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापळा बनला आहे. आजवर या महामार्गावर अनेक निरपराध नागरिकांचे अपघातामुळे बळी गेले असून शेकडो गंभीर रित्या जखमी झाले आहेत. कंपनी प्रशासनाच्या व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या ... Read More »

शिवसेनेविरोधात आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल

दि. 15 : पदवीधर मतदार संघाची आचारसंहिता लागू असताना न नफा ना तोटा या तत्वावर विद्यार्थ्यांना वह्यांची विक्री केल्याप्रकरणी शिवसेनेसह पालघर प्रतिष्ठाणच्या पदाधिकार्‍यांविरोधात आचारसंहितेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंबई शिक्षक, मुंबई पदवीधर व कोकण विभाग पदवीधर या तीन विधानपरिषद मतदार संघाची द्विवार्षिक निवडणूक 25 जून रोजी होत असुन या निवडणूकांच्या अनुषंगाने जिल्ह्यात आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. मात्र, बुधवारी ... Read More »

Scroll To Top