दिनांक 26 May 2020 वेळ 5:39 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: Palghar

Tag Archives: Palghar

दैनिक राजतंत्र अपडेट्स (04.04.2020; सकाळी 10 वा.)

पालघर जिल्ह्यात, कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 11 व मृत्यूची संख्या 2 अशी स्थिर राहिली आहे.  9 जणांवर उपचार चालू आहेत. 7 जण कस्तुरबा रुग्णालय (मुंबई), 1 जसलोक रुग्णालय (मुंबई), 1 ग्रामीण रुग्णालय (पालघर) येथे उपचार घेत आहेत. आजच्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 1060 जणांची (64 ने वाढ) पडताळणी करुन 852 लोकांना होम क्वारन्टाईन (35 ने वाढ) करण्यात आले आहे. त्यातील 439 जणांचा 14 दिवसांचा कालावधी ... Read More »

पालघर तालुक्यात कोरोनाचा पहिला बळी; उद्यापासून जिल्ह्यात गांभीर्याने Lock Down ची अंमलबजावणी!

दि. 31.03.2020: पालघर तालुक्यातील उसरणी येथील 50 वर्षीय कोरोना संशयीत रुग्णाचा आज सायंकाळी 7 वाजताच्या सुमारास पालघर ग्रामीण रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.हा रुग्ण 28 मार्च रोजी सफाळे येथील पार्थ रुग्णालय येथे सुका खोकला, ताप व श्वसनास त्रास होत असल्याने उपचारासाठी आला होता. त्याला कोरोना बाधा झाल्याची शंका आल्याने पालघर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले. तेथे त्याला कोरोना संशयीत रुग्ण म्हणून ... Read More »

पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधीतांची आकडेवारी (28.03.2020 रोजीची) आशादायक

दि. 28 मार्च (संजीव जोशी): पालघर जिल्ह्यामध्ये आज रोजी (28 मार्च) परदेशात प्रवास केलेल्या 625 व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यामध्ये 25 जण हे 60 वर्षे पेक्षा जास्त वयाचे आहेत. देखरेखीखालील प्रवाश्यांपैकी 232 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.37 प्रवाश्यांमध्ये कोरोनाबाधेची लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्यातील 25 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 23 अहवाल ... Read More »

लोकांनी घाबरुन जावू नये! – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे

जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी घाबरुन जाऊ नये! – जिल्हाधिकारी डॉ. कैलाश शिंदे यांचे यूट्यूब व्हिडीओद्वारे आवाहन.जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा उपलब्ध असून लोकांनी घाबरुन जाऊ नये. सर्व जीवनावश्यक वस्तू विक्रेत्यांची यादी तयार करण्यात येत असून लोकांना औषधे, भाजीपाला व जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्याची व्यवस्था करण्याची उपाययोजना जिल्हा प्रशासनामार्फत सुरु आहे. लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये व दुकानात जावे ... Read More »

पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधेबाबत आकडेवारी (25.03.2020 रोजीची)

पालघर, दिनांक 25.03.2020: पालघर जिल्ह्यामध्ये परदेशात प्रवास केलेल्या 553 व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यामध्ये 21 जण हे 60 वर्षे पेक्षा जास्त वयाचे आहेत. देखरेखीखालील प्रवाश्यांपैकी 131 जणांचा 14 दिवसांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे.20 प्रवाश्यांमध्ये कोरोनाबाधेची लक्षणे आढळल्यामुळे त्यांच्या घशाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले असून त्यातील 18 नमुन्यांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. प्राप्त अहवालांपैकी 17 अहवाल निगेटिव्ह आले असून 1 अहवाल पॉझिटिव्ह ... Read More »

Let’s Fight with CORONA…Daily Rajtantra Updates!

धक्कादायक: “त्या” मच्छीमारांना झाईला सोडणाऱ्या बोटीवर गुन्हा दाखल! समुद्रात अडकलेल्या मच्छीमारांच्या अडचणी वाढल्या!….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! गुजरातमध्ये अडकलेले मच्छीमार परतण्याची प्रक्रीया सुरु; 14 दिवसांचे क्वारन्टाईन….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! पालघर जिल्ह्यात कोरोनाचा 5 वा बळी….. सविस्तर बातमी वाचण्यासाठी या Link वर Click करा! डहाणूरोड भाजी मार्केट: सोशल डिस्टन्सींगची ऐसीतैसी….. सविस्तर बातमी ... Read More »

पालघर-बोईसर रस्त्यावर देशी पिस्टलसह एकाला अटक

पालघर, दि. 4 : देशी बनावटीचे पिस्टल विक्री करण्यासाठी आलेल्या 31 वर्षीय तरुणाला पालघर पोलिसांनी जेरबंद केले असुन त्याच्याकडून 25 हजार रुपये किंमतीची एक देशी बनावटीची पिस्टल जप्त करण्यात आली आहे. एक इसम सोमवारी संध्याकाळी पालघर-बोईसर रस्त्यावरील प्रांत ऑफीस परिसराजवळ गावठी पिस्टलची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पालघर पोलिसांना मिळाली होती. माहिती मिळताच पोलीस उपनिरिक्षक योगेश खोंडे, पोलीस हवालदार रविंद्र ... Read More »

पालघर जिल्हा परिषदेत शिवसेनेची मुसंडी

18 जागांसह ठरला सर्वात मोठा पक्ष; राष्ट्रवादी काँग्रेसचीही 14 जागांवर मजल राजतंत्र न्यूज नेटवर्क/पालघर, दि. 9 : मंगळवारी (दि. 7) पालघर जिल्हा परिषदेच्या 57 जागांसाठी पार पडलेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेने मुसंडी मारली आहे. शिवसेना 18 जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर त्यापाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसने 14 जागांवर मजल मारली आहे. 2015 साली झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक 21 जागा जिंकणार्‍या भाजपला ... Read More »

पालघर जिल्ह्यातून भाजपला हद्दपार करा -जितेंद्र आव्हाड

सत्तेची झूल गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ असल्याची केली टीका जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकी संदर्भात आव्हाडांची वाड्यात प्रचार रॅली व सभा प्रतिनिधी/वाडा, दि. 2 : सत्तेची अंगावर असलेली झूल गेल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस खूप अस्वस्थ झाले असल्याची टीका विद्यमान मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कुडूस येथील सभेमध्ये केली. तर जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री भाजपचेच असताना देखील त्यांच्या सरकारच्या पाच वर्षाच्या काळात ... Read More »

पालघरमध्ये अमली पदार्थांची विक्री सुरूच!

शाळकरी व महाविद्यालय विद्यार्थ्यांसह तरुण पिढी नशेच्या विळख्यात वार्ताहर/बोईसर, दि. 22 : पालघर तालुक्यातील झोपडपट्टी व गजबजलेल्या वसाहतींमध्ये राजरोसपणे अमली पदार्थांची विक्री होत असून त्यावर नियंत्रण ठेवल्यास पोलिस यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. त्यामुळे तरुण पिढीसह शाळकरी, महाविद्यालय व विशेषत: अभियांत्रिकी महाविद्यालयाचे विद्यार्थी या अमली पदार्थांच्या विळख्यात अडकले असून अमली पदार्थ विक्री करणार्‍या व्यापार्‍यांना पोलिसांचे छुपे संरक्षण मिळत असल्याचा आरोप ... Read More »

Scroll To Top