दिनांक 04 July 2020 वेळ 1:32 AM
Breaking News
You are here: Home » Tag Archives: Dahanu (page 2)

Tag Archives: Dahanu

डहाणू पेंशनर्स डे उत्साहात साजरा

प्रतिनिधी/डहाणू, दि. 18 : सेवानिवृत्त कर्मचारी संघाच्या डहाणू विभागातर्फे 17 डिसेंबर पेंशनर डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त मसोली येथील साईबाबा मंदिराच्या सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डहाणू तालुका सेवानिवृत्त संघाचे अध्यक्ष मारुती वाघमारे, डहाणू विभागाच्या अध्यक्षा सौ. शैलजा पाटील, पालघर जिल्हा संघटनेचे सरचिटणीस बापूराव देवकर, कासा विभागाचे अध्यक्ष हेमंत धर्ममेहेर, डहाणू तालुका ... Read More »

डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला

वार्ताहर/बोईसर, दि. 15 : डहाणू तालुका पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्याने हादरला असून आज, रविवारी पहाटे काही भागांमध्ये 3.8 रिस्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्याने नागरीकांची झोप उडवली. डहाणू तालुका हा भूकंपग्रस्त तालुका समजला जातो. गेले वर्षभर येथील धुंदलवाडी, हळदपाडा, बहारे, वंकास यांसारख्या भागात भूकंपाचे हादरे बसत आहेत. काही दिवसांपासुन भूकंपाचे धक्के बंद झाल्याने या भागातील नागरीकांना दिलासा मिळाला होता. मात्र 12 ... Read More »

पतंजलिचे योग शिक्षक प्रशिक्षण संपन्न

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. 15 : पतंजलि योग समिती (डहाणू) व लायन्स क्लब ऑफ डहाणू यांच्यातर्फे योगाचा प्रचार व प्रसार केला जातो आहे. विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांबरोबरच विद्यार्थ्यांना देखील योगासनांचे धडे दिले जातात. या कार्यासाठी योगशिक्षक उपलब्ध व्हावेत याकरिता प्रशिक्षण वर्ग आयोजीत केले जातात. 14 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत डहाणूतील काँग्रेस भवन येथे अशा प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले. ... Read More »

डहाणू : वरवाडा आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची आत्महत्या

वार्ताहर/डहाणू, दि. 1 : डहाणू तालुक्यातील घाट (पाटीलपाडा) येथील कु. सारिका रघु पाटकर या 16 वर्षीय विद्यार्थीनीने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. सारिका ही वरवाडा आश्रम शाळेत इयत्ता अकरावीच्या विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत होती. मात्र अभ्यास झेपत नसल्याने तिने आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. डहाणू तालुक्यातील पाटीलपाडा येथील चार मैत्रिणींनी आपले दहावीपर्यंतचे एकत्र शिक्षण ... Read More »

डहाणू विधानसभा मतदारसंघ भाजप राखणार की गमावणार?

रेशनिंग दुकाने आधारशी जोडल्यानंतर रेशनिंगच्या व्यवसायाला मर्यादा आल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीशी तोंड देताना राज्यातील शेतकर्‍यांवर आत्महत्या करण्याची वेळ येत आहे. मात्र रेशनिंग, शेती आणि हॉटेल हा व्यवसाय करणार्‍या धनारे यांची श्रीमंती अनेक पटीने वाढली आहे. त्यांच्या या प्रगतीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. Read More »

कुपोषित बालकांच्या नावाने प्रोटीन खरेदी; ग्रामपंचायतींचा लाखो रुपयांचा गैरव्यवहार

राजतंत्र न्युज नेटवर्क/डहाणू दि. ८: डहाणू व तलासरी तालुक्यातील ग्रामपंचायतींनी कुपोषित बालकांसाठी माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीकडून लाखो रुपयांची प्रोटीन पावडर खरेदी केली असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्ट्राचार झाल्याचे समोर येत आहे. जव्हार तालुक्यामध्ये कोट्यावधी रुपयांची अशी प्रोटीन पावडर खरेदी झाल्याचे समजते. माय लाईफ स्टाईल या मार्केटिंग कंपनीने प्रोटीन पावडर विकण्यासाठी अनेक एजंट नेमले असून या एजंटना १२ टक्के ... Read More »

जगण्यासाठी संघर्ष करणाऱ्या युवकाला महिला शक्तीने दिले बळ

राजतंत्र मिडीया/डहाणू दि. ६ ऑक्टोबर: २९ मार्च २०१७ रोजी सायकलवरुन पडल्याने डोक्याला जबर इजा होऊन रुग्णालयात दाखल असलेल्या कुणाल प्रवीण मळेकर (डहाणू) या २१ वर्षीय युवकाच्या जगण्यासाठीच्या संघर्षाला बळ देण्यासाठी डहाणूतील महिला शक्ती पुढे सरसावली आहे. शिक्षण क्षेत्रातील नामांकित व्यक्तीमत्व असलेल्या अनाहिता नजमी यांनी त्यासाठी पुढाकार घेत सोशल मिडीयाच्या माध्यमातून आव्हान केले. त्यांच्यासह काही महिलांच्या पुढाकाराने मदतफेरीचे आयोजन करण्यात आले ... Read More »

कर्णबधिर शाळेचे कार्य खूपच कौतिकास्पद! – मोहनभाई पटेल

राजतंत्र न्यूज नेटवर्क डहाणू दि. ९: येथील ठाणे जिल्हा स्त्री शक्ती जागृती समिती संचलित कर्णबधिर विद्यालयाचे कार्य खूपच कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांसाठी अतिशय अत्याधुनिक सुविधा पुरविल्या जात असल्याचे पाहुन समाधान वाटल्याचे प्रशंसोद्गार मुंबईचे माजी नगरपाल तथा ज्येष्ठ समाजसेवक मोहनभाई पटेल यांनी डहाणू येथे बोलताना काढले. मुक बधिर बाल विकास केंद्राच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ” जिद्द स्वावलंबनाची ” या माहितीपटाचे पटेल ... Read More »

माधव भांडारी यांच्या उपस्थितीत पोंदा हायस्कूलच्या नूतन इमारतीचे लोकार्पण

राजतंत्र मिडीया दि. 15 ऑगस्ट 2018: डहाणू शहरातील ” डहाणू एज्युकेशन ट्रस्ट ” संचलीत के. एल. पोंदा हायस्कूल व बाबूभाई पोंदा कनिष्ठ महाविद्यालयासाठी उभ्या राहिलेल्या 21 व्या शतकाला साजेशा अशा नूतन वास्तूचे उद्घाटन आज पार पडले. या निमित्ताने संस्थेचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ विधिज्ञ प्रकाश करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजीत करण्यात आलेल्या एका शानदार कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी असलेले महाराष्ट्र राज्य पुनर्वसन ... Read More »

करंदीकर महाविद्यालयाकडून काळाची पाऊले ओळखून तंत्रज्ञानाचा वापर करणे कौतुकास्पद! – चंद्रगुप्त पावस्कर

राजतंत्र मिडीया / डहाणू दि. १२: ज्ञान भारती सोसायटीच्या विश्वस्तांनी एस. आर. करंदीकर महाविद्यालयामध्ये काळाची पावले ओळखत तंत्रज्ञानाचा वापर सुरु केला आहे. हा दृष्टिकोन निश्चितच कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन नूतन बाल शिक्षण संघाचे अध्यक्ष चंद्रगुप्त पावस्कर यांनी डहाणू येथे बोलताना केले. ते ज्ञानभारती सोसायटी संचलीत एस. आर. करंदीकर महाविद्यालयामध्ये सुरु करण्यात आलेल्या व्हर्च्युअल क्लासरुमच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. ... Read More »

Scroll To Top